धामणगाव नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:50+5:302021-02-23T04:20:50+5:30

मुख्याधिकारी रस्त्यावर : कर्मचाºयांवर होणार कारवाई धामणगाव रेल्वे : शहरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहून दररोज ५ वाजतानंतर सुरू ...

Dhamangaon Municipality on Action Mode | धामणगाव नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर

धामणगाव नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर

Next

मुख्याधिकारी रस्त्यावर : कर्मचाºयांवर होणार कारवाई

धामणगाव रेल्वे : शहरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहून दररोज ५ वाजतानंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. विनामास्क व अधिक प्रवासी असलेल्या ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांवर कारवाई न केल्यास नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे निर्देश मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिले आहे.

धामणगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. पोलीस प्रशासन व नगरपरिषदेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. नगरपरिषद कर्मचारी जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दिवसभर शहरात एखाद्या दुकानावर गर्दी दिसल्यास ते दुकान सील करणे गरजेचे आहे. नेमलेल्या पथकाने ही कारवाई करणे महत्त्वाची आहे. ही कारवाई योग्य पद्धतीने झाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी उरकुडे यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून विनामास्क वाहनधारकांवर कारवाई केली. दरम्यान आमदार तथा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नगरपरिषदेच्या सर्व विभागाची ऑनलाईन बैठक घेतली.

Web Title: Dhamangaon Municipality on Action Mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.