पतंगीच्या मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:28+5:30

वेदांत हा पतंग उडविण्याचा हट्ट करीत असल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. तीन दिवसांपूर्वी तो गच्चीवर पतंग उडवीत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याची गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते.

The death of a kite by a kite's cat | पतंगीच्या मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू

पतंगीच्या मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देधामणगावातील घटना : तीन दिवसांपूर्वी मानेला इजा

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : संक्रांतीचा सण पतंग उडवून साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायना मांजाने सात वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला. तालुक्यातील वसाड येथे ही घटना घडली.
वेदांत पद्माकर हेंबाडे (७) असे चिमुकल्याचे नाव आहे. तो धामणगाव रेल्वे शहरात हरीबाई प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. हेंबाडे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी धामणगाव रेल्वे शहरात वास्तव्यास असून, पाण्याच्या टाकीजवळ भाड्याने राहतात. वेदांत हा पतंग उडविण्याचा हट्ट करीत असल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. तीन दिवसांपूर्वी तो गच्चीवर पतंग उडवीत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याची गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतरही जखम चिघळल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास वसाड गावाहून अमरावती येथे उपचाराकरिता नेण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी वसाड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

धामणगावातील
पहिली घटना
मृत वेदांत याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याला अभ्यासात चांगली प्रगती होती. धामणगाव रेल्वे तालुक्यात पतंगीच्या मांज्यामुळे मृत्यूची घडलेली ही पहिली घटना आहे.

Web Title: The death of a kite by a kite's cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात