‘त्या‘ मृत कोंबड्याप्रकरणी पुन्हा पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:11+5:302021-03-05T04:14:11+5:30

अमरावती : यापूर्वी भानखेडा परिसरात फेकलेल्या मृत कोंबड्या व येथीलच एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या नमुन्यात आढळलेला विषाणू एकाच प्रकारचा ...

‘That’ dead hen case was reported to the police again | ‘त्या‘ मृत कोंबड्याप्रकरणी पुन्हा पोलिसांत तक्रार

‘त्या‘ मृत कोंबड्याप्रकरणी पुन्हा पोलिसांत तक्रार

Next

अमरावती : यापूर्वी भानखेडा परिसरात फेकलेल्या मृत कोंबड्या व येथीलच एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या नमुन्यात आढळलेला विषाणू एकाच प्रकारचा असल्याची माहितीवजा तक्रार अमरावती पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी गुरुवारी फ्रेजरपुरा ठाण्यात दिली.

यासंर्दभात ‘लोकमत’ने जनदरबारात वृत्त मांडले होते. भानखेड मार्गावर अज्ञात व्यक्तीने ५० मृत कोंबड्या फेकल्याची घटना ११ फेब्रुवारीला निदर्शनास आली होती. या कोंबड्याचे नमुने घेण्यात येऊन पुणे व भोपाळ लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर अहवाल ‘बर्ड फ्यू’ पॉझिटिव्ह आलेला होता. त्यामुळे १ किमी त्रिजेच्या अंतरातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, पुन्हा एका पोल्टी फार्ममधील दोन नमुने ‘बर्ड फ्यू’ पॅझिटिव्ह आले. त्यामुळे त्या फार्ममध्ये त्यावेळी असलेल्या २५० कोंबड्यांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. मात्र, शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्या नष्ट करण्यासाठी पथक गेले असता, या पोल्ट्री फार्मवर पथकाला एकही कोंबडी आढळून आलेली नसल्याने २५० कोंबड्या विकल्या की, मृत पावल्या, याबाबतचा संशय व्यक्त होत आहे. संक्रमित कोंबड्या जर मृत झाल्या असतील तर त्याची विल्हेवाट परस्पर कशी लावण्यात आली, याबाबत पशुसंवर्धन विभागाने संबंधितांवर कुठलीच कारवाई न करता घुमजाव केला आहे.

बॉक्स

दोन्ही ठिकाणच्या कोंबड्यांमध्ये सारखाच विषाणू

पशुसंर्धन विभागाला प्राप्त ‘बर्ड फ्यू’ पॅझिटिव्हच्या अहवालानुसार दोन्ही नमुन्यांमध्ये एकच विषाणू आढळल्याने रस्त्यावर फेकलेल्या व पोल्ट्री फार्ममध्ये सापडलेल्या कोंबड्या एकच असल्याच्या नित्कर्षाप्रत पशुसंर्वधन विभाग आला आहे. त्यांनी याविषयीची तक्रार गुरुवारी फ्रेजरपुरा ठाण्यात दिली असून, हा पोलीस तपासाचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही घुमजाव

भानखेड परिसरातील ‘त्या’ पोल्ट्री फार्ममधील नमुने ‘बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्यानंतर या एक किमी परिसरातील ३३,६०० कोंबड्या नष्ट करतेवेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट दिली होती व त्या फार्मच्या २५० बाधित कोंबड्या नष्ट करताना गायब असल्याने निदर्शनात आल्याने त्यांनी संबंधितांवर ‘एफआयआर’ नोंदविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचा पशुसंवर्धन विभागाने घुमजाव केला आहे.

Web Title: ‘That’ dead hen case was reported to the police again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.