जिल्हाधिकाऱ्यांकडून देवमाळी, कांडलीत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:53+5:302021-02-23T04:20:53+5:30

तालुक्यात देवमाळी व कांडली हे दोन्ही कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. अवघ्या दहा दिवसांत या दोन्ही ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत दीडशेहून अधिक ...

Curfew in Devmali, Kandli by District Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून देवमाळी, कांडलीत संचारबंदी

जिल्हाधिकाऱ्यांकडून देवमाळी, कांडलीत संचारबंदी

Next

तालुक्यात देवमाळी व कांडली हे दोन्ही कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. अवघ्या दहा दिवसांत या दोन्ही ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत दीडशेहून अधिक कोरोना रुग्ण नोंदविले गेले आहे. खासगी प्रयोगशाळेतील व खासगी दवाखान्यात परस्पर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या यात समाविष्ट नसल्याचे गावपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे कांडलीत मृत्यूही घडले आहेत. या संचारबंदीत कांडली आणि देवमाळी क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी स्वस्त धान्य दुकाने, दुध, भाजीपाला दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

बिगर जीवनाश्यक दुकाने मात्र बंद राहतील. खरेदीकरिता जवळपासची दुकाने, बाजारपेठेतील दुकानांचाच लोकांनी उपयोग घ्यावा. दूरचा प्रवास करून खरेदी टाळण्याच्या सूचनाही या आदेशात केल्या आहेत. संचारबंदीदरम्यान कांडली व देवमाळीतील शाळा बंद राहणार आहेत. माल वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील. सार्वजनिक वाहतुकी अंतर्गत बस स्टॅण्डवर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना वाहतुकीबाबत परवानगी अनुज्ञेय आहे. पोलीस निरीक्षकांकडून परवानगी घ्यावी लाणार आहे.

Web Title: Curfew in Devmali, Kandli by District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.