हॅलो, वेतनासाठी कोरोना लस प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपये द्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 05:16 PM2021-11-28T17:16:41+5:302021-11-28T17:19:15+5:30

जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वेतनासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत, टोळी सक्रिय झाली असून पाचशे रुपयात कोरोना प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे पुढे आले आहे.

covid vaccination certificate selling for 500 rupees call viral | हॅलो, वेतनासाठी कोरोना लस प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपये द्या..!

हॅलो, वेतनासाठी कोरोना लस प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपये द्या..!

Next
ठळक मुद्देफोनवर येणाऱ्या संवादाने खळबळ, आरोग्य विभागात अलर्ट

लोकमत विशेष

अमरावती : ‘हॅलो, नमस्कार. लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपयात मिळेल. पगारासाठी आवश्यक आहे. ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल, त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या संवादाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. कुटुंब, स्वतःच्या आरोग्यासह देशावर आलेले कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आरोग्य व सर्वच विभाग रात्रंदिवस जनजागृती करीत आहेत. कालपर्यंत न मिळणारी लस आज सहज उपलब्ध होत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध कार्यालयांतर्फे कोरोना लसीचे प्रत्येक व्यक्तीने दोन्ही डोज घेतल्याचे प्रमाणपत्र वेतनासाठी आवश्यक करण्यात आले आहे. याचाच फायदा घेणारी टोळी सक्रिय झाली आहे. शासनाची वेबसाईट असली तरी त्याला चालविणारे आरोग्य विभागातील काही ऑपरेटर संगनमताने प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे ‘मोबाईल कॉलिंग’वर होणाऱ्या संभाषणामुळे पुढे आले आहे.

वेतनासाठी आवश्यक प्रमाणपत्र

जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वेतनासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुसरीकडे वेतनासाठी प्रमाणपत्र दिल्यावरच काढण्याचे फर्मान कार्यालयप्रमुखांनी जारी केले. याचाच फायदा उचलत पाचशे रुपयात कोरोना प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे पुढे आले आहे. फोनवर पाचशे रुपयांमध्ये कोरोना लसीचे प्रमणपत्र देण्याचे संभाषण व्हायरल होत आहे

हा तर स्वत:लाच धोका

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. असे प्रमाणपत्र कोणी देत असेल आणि घेत असेल, तर ते स्वतः, कुटुंब आणि देशासाठी धोकादायक आहेत. यासंदर्भात प्रशासनाला तात्काळ माहिती पुरवण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

कोरोना लसीकरण न करता प्रमाणपत्र विकत देणे व घेणे गंभीर बाब आहे. यासंदर्भात आरोग्य विभागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. असे कोणी आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आव्हान केले आहे.

डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: covid vaccination certificate selling for 500 rupees call viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.