Coronavirus in Amravati: अमरावतीमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह. कोरोनाग्रस्तांची संख्या २२६ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:04 AM2020-06-01T10:04:02+5:302020-06-01T10:04:31+5:30

दसरा मैदान येथे एक व चेतनदास बगीचा  येथे दोन व्यक्ति तसेच अचलपूर तालुक्यात काकडा येथे एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले

Coronavirus: Eight more positive in Amravati. The number of corona victims is 226 | Coronavirus in Amravati: अमरावतीमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह. कोरोनाग्रस्तांची संख्या २२६ 

Coronavirus in Amravati: अमरावतीमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह. कोरोनाग्रस्तांची संख्या २२६ 

Next

अमरावती : शहरासह जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने जिल्हयात कोरोनाग्रस्तांची संख्या २२६ वर पोहोचली आहे .                 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेव्दारा प्राप्त अहवालानुसार येथील बुधवारा  कंटेनमेंटमध्ये बाधिताच्या संपर्कातील व सध्या संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या चार व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. दसरा मैदान येथे एक व चेतनदास बगीचा  येथे दोन व्यक्ति तसेच अचलपूर तालुक्यात काकडा येथे एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्या व्यक्तींना आता कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील वार्डात उपचारार्थ दाखला करण्यात आलेले आहे . जिल्हयात बाधितांची संख्या आता २२६ वर पोहोचली आहे. यामध्ये १५ मृत, १२० कोरोनामुक्त व ९१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

Web Title: Coronavirus: Eight more positive in Amravati. The number of corona victims is 226

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.