coronavirus : खासदार, आमदारांनी केली कलेक्टर, सीएसची तक्रार, लोकप्रतिनिधींचेच हे हाल, सामान्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:26 PM2020-04-20T22:26:22+5:302020-04-20T22:27:00+5:30

आमदार व खासदारांचे नमुने सदोष घेण्यात आले असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल आमदार राणांनी या तक्रारीमध्ये केला आहे.

coronavirus: coronavirus: MPs, MLA complaints of collectors, CS | coronavirus : खासदार, आमदारांनी केली कलेक्टर, सीएसची तक्रार, लोकप्रतिनिधींचेच हे हाल, सामान्यांचे काय?

coronavirus : खासदार, आमदारांनी केली कलेक्टर, सीएसची तक्रार, लोकप्रतिनिधींचेच हे हाल, सामान्यांचे काय?

Next

अमरावती - जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह असताना कोरोनाविषयी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी गंभीर नाहीत. ते केबिनबाहेर निघत नाहीत. आमदार व खासदारांचे सॅम्पल रिजेक्ट झाले आहेत. अप्रशिक्षित कर्मचारी  थ्रोट स्वॅब घेतात. एकूण जिल्ह्याची यंत्रणाच बिघडली आहे. कोरोना रोखण्यास हे दोन्ही अधिकारी अयशस्वी ठरले आहेत, अशी तक्रार आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोमवारी केली. खासदार नवनीत राणा यांनीही टष्ट्वीट केले.

सलग तीन दिवस तापाने फणफणलेले व उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल झालेले आमदार रवि राणा व त्यांच्या संपर्कात असलेल्या खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सदोष घेण्यात आल्याने नागपूरच्या ‘एम्स’ लॅबने नाकारले. आमदार व खासदारांचे नमुने सदोष घेण्यात आले असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल आमदार राणांनी या तक्रारीमध्ये केला आहे. त्यांनी थ्रोट स्वॅब घेण्याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांना फोन केल्यानंतर दोन दिवसांनी तो घेण्यात आला. नमुने घेण्यासाठी आलेले कर्मचारीदेखील अप्रशिक्षित होते. जे ग्लोव्ह्ज घालून आमदारांचा स्वॅब कर्मचाºयांनी घेतला, तेच कायम ठेवून खासदार नवनीत राणा यांचा स्वॅब घेतला. या कर्मचा-याचे हातदेखील थरथरत होते. एकूण या प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने नमुने घेण्यात आल्यानेच लॅबने नाकारल्याची तक्रार आमदार राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून केली. 

नमुने चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे ‘एम्स’ लॅबच्या डॉ. मिणा यांनी सांगितले. किंबहुना अमरावती येथून बरेचसे नमुने चुकीच्या पद्धतीने घेतली जातात. त्यामुळे ४० हून अधिक नमुने नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याचे आमदारांनी आरोग्यमंत्र्यांना सांगितले. याविषयी खुद्द आरोग्यमंत्र्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी देखील आमदार राणा यांनी केली.

दोन्ही अधिकारी केबिनबाहेर केव्हा निघणार?
४जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम हे दोन्ही अधिकारी केबिनबाहेर निघत नाहीत. अधिकाºयांना जे प्रशिक्षण दिले, त्याचे पालन होत नाही. येथे व्यक्ती मृत झाल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळतो. मुळात अधिकारीच कोरोनाविषयी गंभीर नाहीत. जिल्ह्याची यंत्रणाच बिघडली आहे. आमदाराचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी अप्रशिक्षित कर्मचाºयाला पाठविले जाते; जिल्हा शल्यचिकित्सक येत नाहीत, असा आरोप आमदार राणा यांनी आरोग्यमंत्र्यांशी बोलताना केला.

राणा दाम्पत्याचे नमुने निगेटिव्ह
४आमदार व खासदार राणा दाम्पत्यांचे शनिवारी घेण्यात आलेले नमुन्यांचा अहवाल जिल्हा यंत्रणेपूर्वी त्यांनी ‘एम्स’च्या डॉ. मीना यांच्याकडून जाणून घेतला. नमुने रिजेक्ट केल्याचे ऐकून राणा दांपत्य ‘शॉक’ झाले. पुन्हा रविवारी थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. त्यावेळी नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जीव भांड्यात पडला. आमदार व खासदाराबाबत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा गंभीर नाही तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल राणा दाम्पत्याने आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे केला.

आरोग्य यंत्रणेचे काम चांगले - पालकमंत्री
४जिल्ह्यातील चार संक्रमित कोरोनाग्रस्तांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, सुपरव्हायझिंग यंत्रणा जिवाची पर्वा न करता काम करीत आहे, याचेच हे द्योतक आहे, असे म्हणत जिल्ह्याचे पालक या नात्याचे ना. यशोमती ठाकूर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ना. बच्चू कडू यांचे थ्रोट स्वॅब दोन वेळा घ्यावे लागले. त्यांनी कुठलीच आरडाओरड केली नाही किंवा यंत्रणेवर दबाव आणला नाही. जिल्ह्यात कोरोना नमुने तपासणीच्या दोन लॅब विद्यापीठ व पीडीएमसी येथे सुरू होत आहे. यामध्ये आधी कोणती सुरू होते, यावर राजकारण केले जात आहे. जो प्रस्ताव आधी, तिथे पहिली लॅब व त्यानंतर लगेच दुसरी सुरू होईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.  

सुरक्षित स्वॅब घेण्याची व्यवस्था कोविडमध्ये
४सुरक्षितपणे थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था कोविड रुग्णालयात आहे. आमदार व खासदार राणा दाम्पत्यांच्या विनंतीवरून ते दाखल असलेल्या एका खासगी रुग्णालयातून त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे नागपूरच्या लॅबने नमुना पुन्हा घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे तो घेऊन पाठविण्यात आला, याचा उल्लेख करीत जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सोमवारी निवेदन दिले. खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संवादाची क्लिप माध्यमांवर व्हायरल केली; त्याचा निषेध निवेदनात करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचे स्वॅब नियमित पाठविले जातात. कधी-कधी रिपीट पाठवावे लागतात. येथे कोरोनाचा ‘डेथ रेट’ कमी आहे; नॉन कोविड डेथ आहेत. चार पॉझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत. यंत्रणेचे मनोबल सर्वांनी वाढवायला पाहिजे. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात कोरोनावर मात करूया.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींविषयी आम्हा सर्वांना आदरच आहे. सध्याच्या कठीण समयी जिवाची पर्वा न करता काम करणाºया आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध ताशेरे ओढणे ही खेदाची बाब आहे. त्यांची हिंमत वाढविण्याची या काळात गरज असताना, असा प्रकार झाल्याने त्यांच्या मनोधैर्यावर फरक पडतो.
- डॉ. श्यामसुंदर निकम,  जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: coronavirus: coronavirus: MPs, MLA complaints of collectors, CS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.