कोरोनाचा कहर सुरूच; पुन्हा ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:01:10+5:30

आतापर्यंत कोविड-१९ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून १६६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. १६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ७२ संक्रमित दाखल असून, चार रुग्णावर नागपूर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Corona's havoc continues; 11 again | कोरोनाचा कहर सुरूच; पुन्हा ११

कोरोनाचा कहर सुरूच; पुन्हा ११

Next
ठळक मुद्देमंगलधाम कॉलनीत शिरकाव : आतापर्यंत आढळले २७० पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात शुक्रवारी ११ कोरोना संक्रमिताची नोंद झाली. विद्यापीठ लॅबमध्ये १९० नमुन्यांची चाचणी झाली. यात ११ पॉझिटिव्ह तर, १७९ नमुने निगटिव्ह आढळले. या आठवड्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या बघता, कोरोनाने शहरात कहर केल्याचे दिसून येते. कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता २७० झाली आहे.
शहराच्या पूर्वेकडील मंगलधाम कॉलनी या नव्या भागात कोरोनाने शिरकाव केल्याने कंटनेमेंट झोनच्या संख्येतही वाढ होईल. आरोग्य यंत्रणेला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात फ्रेजरपुरा येथील ३५ वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील २३ वर्षीय महिला, औरंगपुरा येथील २२ वर्षीय महिला, गेट लाइफ हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय पुरुष, २१ व ४४ वर्षीय महिला, बुधवारा येथील २६, ४५ आणि २२ वर्षीय महिला, अन्सारनगर येथील ६५ वर्षीय महिला आणि मंगलधाम कॉलनी येथील ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आतापर्यंत कोविड-१९ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून १६६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. १६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ७२ संक्रमित दाखल असून, चार रुग्णावर नागपूर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेकडून थ्रोट स्वॅब घेण्याची तयारी
शहरात शुक्रवारी ११ पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने केली आहे. त्यानंतर संपर्कातील या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने सुपर एक्स्प्रेस हायवे नजीकच्या या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे.

Web Title: Corona's havoc continues; 11 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.