कोरोनाचा हादरा, पुन्हा १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:59+5:30

जिल्ह्यात पहिल्यांदा पाच वर्षांची चिमुुरडी बाधित आढळली. यासह सात महिला व पाच पुरुषांचा संक्रमितांमध्ये समावेश आहे. रविवारी पुन्हा शहराला कोरोनाने हादरा दिला. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

Corona tremor, again 12 | कोरोनाचा हादरा, पुन्हा १२

कोरोनाचा हादरा, पुन्हा १२

Next
ठळक मुद्देएकूण १६४ : पाच वर्षांची चिमुरडी संक्रमित, हबीबनगरही बनले हॉटस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मसानगंजनंतर हबीबनगरही आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. अमरावती विद्यापीठाकडून रविवारी दुपारपर्यंत प्राप्त दोन टप्प्यात १२ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये हबीबनगरात एका परिवारातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कातील आठ संक्रमित आढळून आल्याने हा परिसर आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या व्यतिरिक्त मसानगंज हॉटस्पॉटमध्ये रविवारी पुन्हा १९ वर्षीय युवकाची नोंद झाली. दिवसभरात निष्पन्न झालेले सर्व पॉझिटिव्ह यापूर्वी जाहीर केलेल्या कंटेनमेंटमधील आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदा पाच वर्षांची चिमुुरडी बाधित आढळली. यासह सात महिला व पाच पुरुषांचा संक्रमितांमध्ये समावेश आहे. रविवारी पुन्हा शहराला कोरोनाने हादरा दिला. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या परिवाराच्या संपर्कातील २२ व ५४ वर्षीय पुरुष व ३६ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त २१ मे रोजी पॉझिटिव्ह अलहिलाल कॉलनीतील एका व्यक्तीच्या संपर्कातील ११ वर्षीय मुलगी तसेच शिवनगरात २१ व २२ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिवनगरातील ३० वर्षीय युवक व ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविले आहे.
कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.
आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांद्वारा पाहणी
जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी रविवारी दुपारी वलगाव मार्गावरील रॉयल पॅलेस व इंजिनीअरिंंग कॉलेज येथील क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. येथे हायरिस्कच्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून, महापालिकेच्या आरोग्य पथकाची तेथे नेमणूक करण्यात आली आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर तारखेडा येथील दवाखान्याला भेट देऊन ही इमारत वापरात आणण्याची सुचना त्यांनी केली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित
शासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारलेल्या कोविड रुग्णालयातील चार कोरोना वॉरिअर आतापर्यंत संक्रमित झाले आहेत. यापूर्वी कोविड रुग्णालयात कार्यरत अंबिकानगर व बेलपुरा येथील दोन सफाई कामगार, शनिवारी अकोल्याच्या अनंतनगरातील रहिवासी असलेला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि रविवारी याच रुग्णालयाची महिला परिचारिका कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. या चौघांव्यतिरिक्त जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना वॉरिअर्स संक्रमित झाले आहेत. कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर सध्या ८० कर्मचाऱ्यांचे चौथे पथक कर्तव्यावर आहे.

Web Title: Corona tremor, again 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.