सेफ झोनमध्येही कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:45+5:30

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. कंटेनमेंटमधून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. पोलीस यंत्रणा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नाही. राज्यातील रेड झोनमधून आलेले नागरिक शहरात मिसळत असल्याने धोका वाढला आहे. यादरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Corona infiltration into the safe zone as well | सेफ झोनमध्येही कोरोनाचा शिरकाव

सेफ झोनमध्येही कोरोनाचा शिरकाव

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा पाच, एकूण १९१ : दसरा मैदान, शोभानगर भागात नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात कोरोनाग्रस्तांचा आलेख चढताच आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी दोन टप्प्यात प्राप्त अहवालात पुन्हा पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १९१ वर पोहोचली आहे.
मसानगंज या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा दोन संक्रमित आढळले. ३० वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त दसरा मैदान या नव्या भागात २६ वर्षीय कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणाची काँटॅक्ट हिस्ट्री अद्याप आरोग्य यंत्रणेला मिळालेली नाही. या मैदानालगत असलेल्या झोपडपट्टीतील तो रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. कंटेनमेंट झोन असलेल्या हनुमाननगरात बाधितांच्या संपर्कात असलेल्या ३५ वर्षीय महिला व शोभानगरात ६४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. रोज नवीन भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने आता नमुन्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. कंटेनमेंटमधून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. पोलीस यंत्रणा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नाही. राज्यातील रेड झोनमधून आलेले नागरिक शहरात मिसळत असल्याने धोका वाढला आहे. यादरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात आरोग्य यंत्रणांद्वारे गृहभेटी दिल्या जात आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दसरा मैदान हे नवे कंटेनमेंट झोन घोषित करून उपाययोजना लागू केल्या आहेत.

‘त्या’ अटेंडंटच्या संपर्कातील दोन बाधित
महापालिकेच्या मसानगंज येथील आरोग्य केंद्रात अटेंडंट संक्रमित झालेला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या घरालगतच्या दोन व्यक्तींचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. यादरम्यान मसानगंज या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३० वर पोहोचली. आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी औषधांचे वाटप येथे होत आहे. महापालिकेसह पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचा आरोप आता होत आहे.
बुधवारी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मसानगंजमधील ‘त्या’ अटेंडंटच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. या भागात होमिओपॅथी औषधांचे वाटप सुरू आहे.
- डॉ विशाल काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
महापालिका

Web Title: Corona infiltration into the safe zone as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.