कोरोना संसर्गात ५३८ पुरुषांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:00 AM2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:53+5:30

 जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत.

Corona infection kills 538 men | कोरोना संसर्गात ५३८ पुरुषांचे मृत्यू

कोरोना संसर्गात ५३८ पुरुषांचे मृत्यू

Next
ठळक मुद्दे‘डेथ ऑडिट’, जिल्ह्यात आतापर्यंत १८८ महिला दगावल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात ५३८ पुरुष व १८८ महिलांचा समावेश आहे. ५० वर्षांवरील रुग्णांवर कोरोनाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून आले. बाधितांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक ५८२ मृत्यू हे ५० वर्षांवरील नागरिकांचे आहे. यामध्येही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले.
 जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेला पहिला कोरोनाग्रस्त हा ‘होमडेथ’ होता. तेव्हापासून कोरोना संसर्गात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये १० मृत्यू झालेत. यात ८ केसेस या ‘होमडेथ’ होत्या. त्यानंतर जिल्ह्यात होमडेथ व्यक्तींचे स्वॅब घेणे बंद केले. त्याऐवजी त्या परिवारातील हायरिस्कमधील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर हा त्यावेळी सात ते आठ टक्के असा असल्याने अमरावती जिल्हा राज्यात सर्वाधिक मृत्युदराचा ठरला होता. 
 जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत. जिल्ह्यात ६० ते ७० वर्षांचे नागरिकांवरच कोरोनाची अधिक वक्रदृष्टी का, याबाबतचे गंभीरतेने विचार होऊन उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.
 

१८९ महिलांचेही मृत्यू
कोरोनाकाळात १८९ महिलांचे मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. यामध्ये ५० ते ७० वयोगटातील अधिक रुग्ण आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार ५१ ते ६०  वयोगटातील ५६, तर ६१ ते ७० या वयोगटातील ५५ महिलांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंगावर दुखणे काढणे व  कॉर्माबिडी आजार व रोगप्रतिकार शक्ती घटणे ही प्रमुख कारणे आहेत.

६१ ते ७० वर्षे वयोगटात मृतांची संख्या अधिक
जिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यूमध्ये ५० ते ६० वयोगटात आतापर्यंत १७५, तर ६१ ते ७० वयोगटात २०९ रुग्णांचा समावेश आहे. या व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी जास्त राहतात व बाहेरच्या व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहत असल्याने त्यांना संसर्ग अधिक होतो. अंगावर लक्षणे काढणेदेखील महागडे ठरू शकते.

पुरुष कामानिमित्त बाहेर असताना, त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे पुरुषांची पॉझिटिव्हिटी अधिक आहे. याशिवाय अंगावर दुखणे काढणे, रोगप्रतिकार शक्तीत घट व कॉमार्बिड आजारांमुळे संसर्गात मृत्यूचे प्रमाण वाढते.
 - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

मार्च महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. त्यावेळी महिनाभरात ७,७१३ पॉझिटिव्हची नोंद व १५४ मृत्यू झाले. मात्र, मार्च २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत १३,५१८ पॉझिटिव्हची नोंद व १६४ जणांचा बळी गेलेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा संसर्ग अधिक असल्याने जिल्ह्यात उद्रेक झाला होता. काही दिवस माघारत नाही तोच पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.

रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची
कोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीचीही महत्त्वाचा भूमिका आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास संसर्गाचा गंभीर परिणाम होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. यासाठी विविध उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने आजार अंगलट येतात.

 

Web Title: Corona infection kills 538 men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.