कोरोना : गावच्या सीमेवर बकेट अन् सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:01:17+5:30

सीमेवर तैनात स्वयंसेवक, युवक ती माहिती वॉकी-टॉकी (वायरलेस फोन) वरून गावातील कार्यालयाला देतात. वॉकी-टॉकीवर मिळालेली माहिती कार्यालयातील युवक संबंधितांपर्यंत पोहचवितात. मिळालेल्या माहितीवरुन गावकरी गावच्या सीमेवर पोहचतो. तेथे सामाजिक अंतर ठेवत त्या परिचिताशी गावकरी संवाद साधतो. संवादानंतर त्यांना परत पाठविले जाते. त्याला गावात प्रवेश दिला जात नाही.

Corona: Bucket and sanitary at village boundary | कोरोना : गावच्या सीमेवर बकेट अन् सॅनिटायझर

कोरोना : गावच्या सीमेवर बकेट अन् सॅनिटायझर

googlenewsNext
ठळक मुद्देवॉकी-टॉकीवरून गावकऱ्यांना दिली जाते माहिती, आतिथ्याच्या अंगाने महामारी रोखण्याचे कार्य

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अचलपूर तालुक्यातील पायविहीर गावच्या सीमेवर गावकऱ्यांनी पाण्याने भरलेली बकेट, पाणी घेण्याकरिता जार आणि साबण व सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे.
गावाच्या चारही सीमा मजबूत दोराने सील केल्या आहेत. बाहेरच्या कुणालाही गावात येण्यास परवानगी नाही. कुणी बाहेरचा इसम, पाहुणा किंवा परिचित आल्यास त्याला गावात प्रवेश दिला जात नाही. गावच्या सीमेवरच थांबवून त्याची विचारपूस केली जाते. त्याची माहिती घेतली जाते. सीमेवर तैनात स्वयंसेवक, युवक ती माहिती वॉकी-टॉकी (वायरलेस फोन) वरून गावातील कार्यालयाला देतात. वॉकी-टॉकीवर मिळालेली माहिती कार्यालयातील युवक संबंधितांपर्यंत पोहचवितात. मिळालेल्या माहितीवरुन गावकरी गावच्या सीमेवर पोहचतो. तेथे सामाजिक अंतर ठेवत त्या परिचिताशी गावकरी संवाद साधतो. संवादानंतर त्यांना परत पाठविले जाते. त्याला गावात प्रवेश दिला जात नाही. गावचे मुखीया शिवराम दहीकर यांचे नेतृत्वात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची दक्षता यावर ग्रामसभेने एकमताने निर्णय घेतले आहेत. गावकºयांनी यादरम्यान दारूची वाहतूक करणाºयाला मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीनही केले. ग्रामस्थ जंगलात, शेतात जाताना सामाजिक अंतरासह स्वच्छतेच्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करीत आहेत.

सहा वॉकी-टॉकी
लॉकडाऊनमध्ये गावात एकूण सहा वॉकी-टॉकीच्या मदतीने कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलकामाच्या अनुषंगाने असलेल्या या वॉकी-टॉकीचा वापर गावाच्या हिताकरिता मोठ्या कल्पकतेने गावकरी करून घेत आहेत. गावातून निघणाºया व सील केलेल्या त्या चारही मार्गावर वॉकीटॉकी घेऊन स्वयंसेवक तैनात आहेत. यात प्रसन्न बिसंदरे, सुशाल धांडेकर, दिलीप जामुनकर, मोहन मोरले या वॉकीटॉकीसह सेवा देत आहेत.

कोरोना अपडेट्स
पायविहीर गावची लोकसंख्या ६३२ असून ११६ घर (कुटुंब) त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वास्तव्यास असलेले ग्रामस्थ आदिवासी असून त्यांची बोलीभाषा कोरकू आहे. सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत त्यांना १९२ हेक्टर जंगल क्षेत्र मिळाले असून, या जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन त्यांनी केली आहे. तिन्ही लॉकडाऊनमध्ये कुणीही गावाबाहेर पडलेले नाही. स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले आहे.

Web Title: Corona: Bucket and sanitary at village boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.