चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:34 PM2019-11-22T12:34:11+5:302019-11-22T12:34:32+5:30

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली.

Chetan Gawande is the 16 th Mayor of Amravati Municipal Corporation | चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर

चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपची सदस्यसंख्या बहुमताला सापेक्ष राहिल्याने महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी ४९ मते पडलीत. या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिलेत. महाशिवआघाडाचा प्रयत्न फसल्याने काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतली. महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक हुसेन यांना २३ मते, बसपचे माला देवकर यांना ५ मते पडली.

Web Title: Chetan Gawande is the 16 th Mayor of Amravati Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mayorमहापौर