मध्य प्रदेश सीमेवर चौफेर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:01:09+5:30

मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनापरवानगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनासह सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे.

Chauffeur settlement on Madhya Pradesh border | मध्य प्रदेश सीमेवर चौफेर बंदोबस्त

मध्य प्रदेश सीमेवर चौफेर बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देविनापरवानगी वाहनांना प्रवेश बंदी : कोरोना विषाणू नियंत्रणासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटात कोरोनाने आठवडाभरापासून पाय पसरविले आहे. धारणी तालुक्यात शनिवारी पाच रुग्ण आढळल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासोबत ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर आळा बसविण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भोकरवडी या वन तपासणी नाक्यावर पोलिसांचा कडक पहारा लावला आहे. विनापरवानगी कोणत्याही वाहनाला मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेशाला आळा घालविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनापरवानगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनासह सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे विनाकारण फिरण्यास जाणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा मार बसत आहे. अमरावती जिल्ह्यात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशाच प्रकारची संचारबंदी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर व खंडवा या जिल्ह्यातील सीमेवरील देडतलाई या गावातसुद्धा रविवारी संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील पोलिसांनी आरटीओ नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील ज्याप्रमाणे कोरोना रुग्णात वाढ होत आहे तशाच प्रकारचे रुग्णांची संख्या मध्यप्रदेशातील बुºहाणपूर आणि खंडवा या दोन्ही जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे . त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सुद्धा दर दिवसाला वाढ होत असल्यामुळे मध्यप्रदेश शासनाने सुद्धा महाराष्ट्र सीमेवर कडक पहारा लावला आहे.

वाहनधारकांना अडचण, सीमाबंदी जारी
वाहतुकीसाठी आवश्यकता असल्यास प्राधिकृत अधिकाºयाकडून परवानगी घेतल्याशिवाय वाहनांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ज्यांना याबाबतीत माहिती नाही, अशा अनेक गरजूंना आपल्या गंतव्यपर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याच्या सीमेवर अधिक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title: Chauffeur settlement on Madhya Pradesh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.