चांदूररेल्वे, दर्यापूर, मेळघाट ‘सेफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:01:01+5:30

दर्यापूर, चांदूर रेल्वे, धारणी व चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही. अमरावतीत पॉझिटिव्ह आढळलेल्या परिचारिकेच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून दर्यापूर येथील तीन व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. चिखलदऱ्यातील दोन मुलींचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आला. वरूडच्या कोरोना संक्रमित महिलेचे कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून चांदूर रेल्वेतील एका कुटुंबाच्या घेतलेल्या थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेत.

Chandur Railway, Daryapur, Melghat 'Safe' | चांदूररेल्वे, दर्यापूर, मेळघाट ‘सेफ’

चांदूररेल्वे, दर्यापूर, मेळघाट ‘सेफ’

Next
ठळक मुद्देलाखांवर अधिक नागरिकांची तपासणी : गावस्तरावर स्वच्छता जागर, तपासणी नाके

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या तब्बल ४८६ वर पोहोचला आहे. शहरातील ७० पेक्षा अधिक भागात कोरोनाचा शिरकाव झाला, तर १४ तालुक्यांपैकी १० तालुक्यांमध्ये ४१ जण कोरोना संक्रमित आढळून आले. यात दिलासादायक बाब म्हणजे, तूर्तास चार तालुके ‘सेफ झोन’मध्ये आहेत. गाव व शहरात बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी, गावागावांत राबविली गेलेली स्वच्छता, तपासणी नाक्यालाच झालेला अटकाव यामुळे कोरोनाचा संसर्ग या चार तालुक्यांमध्ये रोखला गेला.
दर्यापूर, चांदूर रेल्वे, धारणी व चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही. अमरावतीत पॉझिटिव्ह आढळलेल्या परिचारिकेच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून दर्यापूर येथील तीन व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. चिखलदऱ्यातील दोन मुलींचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आला. वरूडच्या कोरोना संक्रमित महिलेचे कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून चांदूर रेल्वेतील एका कुटुंबाच्या घेतलेल्या थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेत.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुचविण्यात आलेल्या उपायांच्या अंमलबजावणीसोबतच अगदी गावात पाय ठेवल्याबरोबर आरोग्य तपासणी झाल्याने संसर्ग रोखला गेल्याची माहिती दर्यापूर, धारणी, चिखलदरा व चांदूर रेल्वे या चारही तालुक्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यात हजारो स्थलांतरित आदिवासी गावात परतले; मात्र कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.

चांदूर रेल्वे, तालुका सुरक्षित
सावंगी मग्रापूर येथे बाहेरगावाहून आलेल्या व्यक्त ीला चांदूर रेल्वे येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. भिलटेक येथे गुजरातहून आलेल्या व्यक्तीलाही क्वारंटाईन करण्यात आले होते. लालखेड येथील क्वारंटाईन व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला. २३ ते ३० जून या कालावधीत सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी शाळा व वसतिगृहे ताब्यात घेण्यात आली. त्यामुळे संसर्ग रोखला गेला. आमला विश्वेश्वर, घुईखेड, पळसखेड व चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात एकूण ३३३ जण दाखल करण्यात आले होते. अद्याप तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी कामी पडली, असे मत चांदूररेल्वे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल यांनी व्यक्त केले.

धारणीतही विलगीकरणावर भर
प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात महसूल व आरोग्य विभागाने कोरोनाबाबत जनजागृती केली. चारदा घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले तसेच कोविड केअर सेंटर उघडून ताप असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यात आली. बाहेरून आलेल्या मजुरांचे विलगीकरण करून त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. बाहेरून आलेल्या १४ नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती धारणीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार यांनी दिली.

मेळघाटात शिरकाव रोखण्याचे प्रयत्न यशस्वी
मेळघाटच्या आदिवासी पाड्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस आदी सर्व यंत्रणांची तपासणी मोहीम शुक्रवारपर्यंत यशस्वी ठरली. ३५०० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. पुणे आणि अकोट येथून आलेल्या दोघांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. ते निगेटिव्ह आले. कोरोनामुक्तीसाठी चिखलदरा तालुक्यातील १५८ गावांमधील जवळपास दीड लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. २४५० नागरिकांना होम क्वारंटाईन, तर १०२० नागरिकांना ८० केंद्रांवर क्वारंटाईन करण्यात आले होते. डोमा, तोरणवाडी, घटांग, बोराळा, खोंगडा, जामली आर, भांडुम, हतरू, खटकाली, काकादरी या दहा ठिकाणी तपासणी नाके असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दर्यापुरात प्रत्येक जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन
दर्यापूर : परजिल्ह्यातून दर्यापूर तालुक्यात आलेल्या ५ हजार ५६१ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले, शिवाय राज्याबाहेरून आलेल्या ७१२ व परदेशातून आलेल्या चार व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे संसर्ग रोखला गेला. तालुका व शहर भागातील एकूण २४ जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. दर्यापूर तालुक्यात येणाºया प्रत्येक मार्गावरील तपासणी नाक्यावर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाºयांकडून तपासणी करण्यात आली. अगदी प्रवेशालाच आरोग्य तपासणी करण्यात आल्याने पुढील संसर्ग टळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र रहाटे यांनी दिली.

Web Title: Chandur Railway, Daryapur, Melghat 'Safe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.