परतवाड्यात १०, अचलपुरात १८ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:45+5:302021-06-20T04:10:45+5:30

अनिल कडू परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील अचलपूर व परतवाडा या जुळ्या नगरीत पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ...

CCTV cameras will be installed at 10 places in Paratwada and 18 places in Achalpur | परतवाड्यात १०, अचलपुरात १८ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

परतवाड्यात १०, अचलपुरात १८ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

googlenewsNext

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील अचलपूर व परतवाडा या जुळ्या नगरीत पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

याकरिता परतवाडा आणि अचलपूर पोलिसांकडून तसा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. अचलपूर नगरपरिषदेनेही याला संमती दिली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याकरिता, समाजविघातक घटनांवर, त्या घडविणाऱ्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरिता पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. घरफोड्या करणाऱ्यासह भुरट्या चोरांवरही या कॅमेराच्या मदतीने पोलिसांना नियंत्रण मिळविता येणार आहे.

यात परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक, दुराणी चौक, संभाजी चौक, चिखलदरा स्टॉप, बसस्थानक, महावीर चौक, कांडली, आठवडी बाजार, बैतूल स्टॉप, अंजनगाव स्टॉप या १० ठिकाणांवर परतवाडा पोलीस ठाण्यांतर्गत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

अचलपूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत विदर्भ मिल ते अचलपूर नाका, चांदूरबाजार नाका, बुद्धेखा चौक, गांधी चौक, काळा हनुमान, टक्कर चौक, पोलीस स्टेशन चौक, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयापुढील चौकात, चावलमंडी, मच्छीटांग, तहसील चौकासह एकूण १८ ठिकाणांवर हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. दरम्यान अचलपूर शहरात सोनवाल चौकासह धार्मिक स्थळावर खासगी व्यक्तींनी सामाजिक जाणीवेपोटी यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

प्रस्ताविक या सर्वच ठिकाणांवरील प्रत्येक ठिकाणी तीन ते चार कॅमेरे लावले जाणार असून, चारही बाजूंवर या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

अचलपूर व परतवाडा पोलिसांकडून दाखल या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या प्रस्तावातील, परतवाडा पोलिसांच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. अचलपूर पोलिसांचा प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दि 19/06/21 / फोटो

Web Title: CCTV cameras will be installed at 10 places in Paratwada and 18 places in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.