अमरावती ग्रामीण पोलीस कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:04+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूबाबत सर्व स्तरांतून जनजागृती सुरू आहे. याच बाबीची दखल ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी घेतली आहे. या विषाणूबाबत अफवा पसरून जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रथम खबरदारी घेतली जात आहे, त्यामुळे समाज माध्यमांतून पसरत असलेल्या अफवांवर लगाम घातला गेला आहे.

Caution against Amravati Rural Police Corona | अमरावती ग्रामीण पोलीस कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सतर्क

अमरावती ग्रामीण पोलीस कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सतर्क

googlenewsNext
ठळक मुद्देअफवांवर लगाम : गर्दी टाळण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांकडून सतर्कता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस प्रशासनाने संसर्ग वाढणार नाही, यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील शहर व गावागावांत प्रमुख ठिकाणी गर्दी होणार नाही व समाज माध्यमांतून अफवांचा फैलाव होणार नाही, याकडे ग्रामीण पोलीस दलाचे विशेष लक्ष असून, कार्यालयात प्रवेश करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूबाबत सर्व स्तरांतून जनजागृती सुरू आहे. याच बाबीची दखल ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी घेतली आहे. या विषाणूबाबत अफवा पसरून जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रथम खबरदारी घेतली जात आहे, त्यामुळे समाज माध्यमांतून पसरत असलेल्या अफवांवर लगाम घातला गेला आहे. पहिल्या दिवसापासूनच कारवाईचा इशारा देण्यात आल्याने सोशल मीडियावर अफवांचे प्रमाण कमी आहे. सायबर पोलीस पथक लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यामधील कर्मचारी तसेच सर्व ठाणेदार यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मास्क व सॅनिटायझरची वाढती मागणी लक्षात घेता, दोन्ही वस्तंूची साठेबाजी व जादा दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मास्क बंधनकारक
शासनाने इतर शासकीय विभागांना कामात सूट दिली आहे. पोलिसांचे काम मात्र वाढले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस अधिकारी कर्मचाºयांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. कार्यालयात येताना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्व पोलिस ठाण्यांतील वाहनातून कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय बंद केले आहे. अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आला आहे.
- हरिबालाजी एन.
जिल्हा पोलीस अधीक्षक

Web Title: Caution against Amravati Rural Police Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.