चिखलदऱ्यात अवैध दारूसह कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:23+5:302021-03-08T04:14:23+5:30

चिखलदरा : परतवाडा येथून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा घटांगमार्गे एका कारमधून नेत असलेला २.३४ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त ...

Car confiscated with illegal liquor in mudslide | चिखलदऱ्यात अवैध दारूसह कार जप्त

चिखलदऱ्यात अवैध दारूसह कार जप्त

Next

चिखलदरा : परतवाडा येथून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा घटांगमार्गे एका कारमधून नेत असलेला २.३४ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. चिखलदरा पोलिसांनी येथील आयटीआयपुढे शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली. प्रदीप शिवहरे (५४, रा. खामला मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

येथील आयटीआयपुढे पोलिसांनी एमएच २७ एसी ७३१८ क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता, त्यात अवैधरीत्या देशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, शिपाई आशिष वरघड, संदीप देवकते, सहकारी करीत आहेत.

Web Title: Car confiscated with illegal liquor in mudslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.