चांदूर बाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:31+5:30

सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यांविरुद्ध गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होऊन तीनही कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, याबाबत डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे, असे आवाहन करण्यात आले. सुमारे एक हजार फूट लांबीचा तिरंगा ध्वज यावेळी रॅलीचे आर्षण ठरले.

CAA in Chandur Bazaar: 'public outcry' against NRC | चांदूर बाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’

चांदूर बाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’

Next
ठळक मुद्देमोर्चा : एक हजार फुटांचा तिरंगा ठरला आकर्षण

चांदूर बाजार : सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ‘एनआरसी’ व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर ‘एनपीआर’ या तीनही मुद्यांविरुद्ध गुरुवारी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होऊन तीनही कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, याबाबत डोळ्यात तेल घालून सजग राहायला हवे, असे आवाहन करण्यात आले. सुमारे एक हजार फूट लांबीचा तिरंगा ध्वज यावेळी रॅलीचे आर्षण ठरले.
संविधान बचाव संघर्ष समिती, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, जमात-ए-उलेमा हिंद, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, आक्रमण संघटना, रणवीर संघटना, बोहरा जमात कमेटी, बहुजन क्रांती मोर्चा, क्रांतीज्योती ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी पक्ष व संघटनांचा रॅली व सभेमध्ये सहभाग होता. सर्वप्रथम आठवडी बाजारातील मिरची साथीमध्ये सभा घेण्यात आली. दुपारी ३ वाजता सभेचे रूपांतर रॅलीत झाले. ही रॅली नेताजी चौक, जयस्तंभ चौक, किसान चौक, शहराच्या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयात नेण्यात आली. तहसीलदारांना संबंधित कायद्याला विरोध दर्शविणारे निवेदन देण्यात आले. नागरिकांनी अशी मोठी रॅली प्रथमच अनुभवली. सभा व रॅलीत मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीचे आकर्षण ठरलेला आठ फूट रुंद व एक हजार फूट लांबीचा तिरंगा स्थानिक काजीपुऱ्यातील मुस्लिम तरूणांनी तयार केला होता. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रभारी एसडीपीओ सोमय मुंडे याच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहिला.

Web Title: CAA in Chandur Bazaar: 'public outcry' against NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.