तिवसा येथे घरात घुसून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:21+5:30

घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चारचाकी वाहनांतून चौघे आले. घरात शिरून त्यांनी अजयच्या मांडीवर सपासप वार केले.

Brutal murder of a youth by breaking into a house at Tivasa | तिवसा येथे घरात घुसून युवकाची निर्घृण हत्या

तिवसा येथे घरात घुसून युवकाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देचाकूने सपासप वार : नागरिकांना दाखविली बंदूक

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : येथील एका २८ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास स्थानिक आंबेडकर चौक येथील मृताच्या घरी हा खुनी थरार घडला. अजय बाबाराव दलाल (२५, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे.
घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चारचाकी वाहनांतून चौघे आले. घरात शिरून त्यांनी अजयच्या मांडीवर सपासप वार केले. तेथे उपस्थित असलेल्यांच्या डोक्यावर बंदूक लावून, तुम्ही आडवे येऊ नका, असे बजावत मारेकऱ्यांनी अजयच्या मांडीत चाकू सोडून पळ काढला. अजयच्या आई-वडिलांनी आरोपींना हटकले. त्यांच्याशी वाद घातला. आरोपी अमरावती-नागपूर महामार्गाने पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजयला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इर्विनमध्ये नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
अजयच्या घरी राहणाऱ्या आरिफ नामक युवकाला आरोपींनी पळवून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, एसडीपीओ सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Web Title: Brutal murder of a youth by breaking into a house at Tivasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून