पुसला येथील वृद्धाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:10+5:30

पोलीस सूत्रांनुसार, बाळकृष्ण भोलाजी भारसाकळे (रा. पुसला), असे मृताचे नाव आहे. ते शनिवारी सकाळी नित्यनेमाने बकऱ्या चराईकरिता खराड शिवारात घेऊन गेले होते. सायंकाळच्या सुमारास हरिदास पाटील यांच्या शेतात बाळकृष्ण भारसाकळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. धडापासून शिर वेगळे केले होते. शरीरापासून एक हात विलग झाला होता.

The brutal murder of an old man in Pusla | पुसला येथील वृद्धाचा निर्घृण खून

पुसला येथील वृद्धाचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देमुंडके धडावेगळे : खराड शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/पुसला : बकऱ्या चराईकरिता शेतात गेलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचे रविवारी सायंकाळी धड व शिर वेगळे झालेला मृतदेह खराड शिवारात शनिवारी सायंकाळी आढळून आला. मृतदेहाचा एक हातदेखील कापला होता.
पोलीस सूत्रांनुसार, बाळकृष्ण भोलाजी भारसाकळे (रा. पुसला), असे मृताचे नाव आहे. ते शनिवारी सकाळी नित्यनेमाने बकऱ्या चराईकरिता खराड शिवारात घेऊन गेले होते. सायंकाळच्या सुमारास हरिदास पाटील यांच्या शेतात बाळकृष्ण भारसाकळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. धडापासून शिर वेगळे केले होते. शरीरापासून एक हात विलग झाला होता. शेंदूरजनाघाट ठाण्याचे पथक पोलीस निरीक्षक गेडाम यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक कार्यवाही केली. दरम्यान घटनास्थळ वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे लक्षात आल्यानंतर वरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात पोलीस ताफा दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरूड उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी धारदार शस्त्राने खून झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. मृत बाळकृष्ण भारसाकळे यांच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून, जावई या नावाने पंचक्रोशीत परिचित होते. शेंदूरजनाघाट पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: The brutal murder of an old man in Pusla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.