क्षेत्रीय तपासणी विमा कंपनीला बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:00 AM2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:42+5:30

परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Binding to a regional inspection insurance company | क्षेत्रीय तपासणी विमा कंपनीला बंधनकारक

क्षेत्रीय तपासणी विमा कंपनीला बंधनकारक

Next
ठळक मुद्देकृषी आयुक्तांची माहिती : पालकमंत्री, आमदार पोहोचले शेतशिवारात

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने खरिपाची पिके बाधित झाली. नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीकडे आतापर्य$ंत १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत. याव्यतिरिक्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयातदेखील हजारो अर्ज दाखल झालेले आहेत. या सर्व नुकसान सूचना अर्जांची क्षेत्रीय तपासणी बंधनकारक असल्याचे आदेश कृषी आयुक्तांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.
परतीच्या पावसाने दहा दिवसांत जिल्ह्यातील एक हजार ६०६ गावांमधील एक लाख ४७ हजार ९१९ हेक्टरमधील खरीप पिके उद्वस्त झालीत. यामध्ये ९५ हजार ८९९ हेक्टरवरील सोयाबीन, ४१ हजार ६९९ हेक्टरमधील कपाशी, ३ हजार १६३ हेक्टरमध्ये ज्वारी, ३ हजार ४६१ हेक्टरमध्ये धान, ७२० हेक्टरमध्ये तूर, १८३ हेक्टरमध्ये मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार ९८९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. परतीच्या पावसाने झालेले नुकसान हे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या तरतुदीत बसत असल्याने शेतकºयांना पीकविमा योजनेचा लाभ मिळू शकतो. याअनुषंगाने जिल्ह्यात १४ हजारांवर नुकसान सूचना अर्ज सादर झाले आहेत.
हे सर्व अर्ज विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींमार्फत एकत्रित करून संबंधित तालुका कृषी आधिकाºयांच्या सहकार्याने सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्तांनी विमा कंपनीला दिले आहेत. ही यादी सर्र्वेक्षण यंत्रणेच्या सुपूर्द करावी, सर्व क्षेत्रीय पंचनाम्याकरिता विमा कंपनीचे अधिकारी संबंधित गावांमध्ये उपस्थित राहतील याची खात्री करावी, अन्यथा शासकीय यंत्रणेद्वारा करण्यात आलेले सर्वे ग्राह्य धरावे लागतील, अशी तंबी कृषी आयुक्तांनी दिली आहे.
जिल्ह्यात दररोज प्राप्त अर्जांचा अहवाल ठेवण्यात यावा व तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राप्त नुकसान अर्जांची क्षेत्रीय तपासणी करणे बंधनकारक असल्याची तंबी कृषी आयुक्तांनी विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना दिल्याची माहिती आहे.

कृषिमंत्र्यांद्वारा बाधित क्षेत्राची पाहणी
कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी रविवारी जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात गोविंदपूर, मोर्शी तालुक्यात काटसूर व अचलपूर तालुक्यात आसेगाव येथील शिवारात जाऊन बाधित पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार बच्चू कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हा बाधित, जिल्हाधिकारी रजेवर
दिवाळीपूर्वी १० दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अशा स्थितीत शासनाच्या माघारी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे आठ दिवसांपासून रजेवर आहेत. याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शनिवारी जिल्हा दौºयावर असलेले राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्याबाबत बैठकीत खडेबोल सुनावले.

शनिवारपर्यंत ३४ हजार संयुक्त पंचनामे
जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाधित १.४५ लाख हेक्टरमधील पिकांचे पंचनाम्याची प्रक्रिया युद्धस्तर सुरू आहे. शनिवारपर्यंत अमरावती तालुक्यात ७३५०, भातकुली ५०३२, नांदगाव खंडेश्वर १३३५, चांदूर रेल्वे ६७४, धामणगाव १८९५, तिवसा ११४९, मोर्शी ६३५०, वरुड २५५, अचलपूर ८१७, चांदूर बाजार १२७४, दर्यापूर १३९१, अंजनगाव सुर्जी ७४०, धारणी ३३९० व चिखलदरा तालुक्यात २२९४ अशा एकूण ३३ हजार ९४६ शेतकºयांच्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले.

विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव
जिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील खरीप पिके बाधित झाल्यावर नुकसानग्रस्त १६०६ गावांमध्ये कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पथक युद्धस्तरावर सर्वेक्षण करीत आहेत. या पथकांसोबत विमा कंपनीचा प्रतिनिधी असणे महत्त्वाचे आहे. मात्र, विमा कंपनीकडे मनुष्यबळ तोकडे असल्यामुळे संयुक्त पंचनामे ग्राह्य धरून शेकºयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश शासनाने विमा कंपनीला दिल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Web Title: Binding to a regional inspection insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.