परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:18+5:30

संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

Benefit of 'One Nation One Ration' to foreigners | परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

परप्रांतीयांना ‘वन नेशन वन रेशन’चा लाभ

Next
ठळक मुद्देपोर्टेबिलिटीद्वारा पुरवठा : धान्य देण्याच्या दुकानदारांना सूचना, दरमहा २० हजारांवर लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात 'वन नेशन वन रेशन'ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे. तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार महाराष्ट्रात किती धान्य देय आहे . तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे. सदरची योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दरमहा २० हजारांवर लाभार्थ्यांना या प्रणालीव्दारे लाभ दिला जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांिगतले.

असे आहे कार्डनिहाय वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड एक किलो मोफत तूर किंवा चना डाळ देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात एप्रिल मे व जून या तीन महिन्यासाठी प्रतिमहिना १७८ मेट्रिकटन तूरडाळ व २६७ टन चणाडाळ उपलब्ध झाली आहे. पुरवठा विभागामार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रतिकार्ड १५ किलो गहू, ३ रुपये किलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. शेतकरी लाभार्थी कार्डावर २ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदळाचे वितरित केले जात आहे.

'वन नेशन वन रेशन' योजनेद्वारे परराज्यातील कार्डधारकांनाही जिल्ह्यात धान्य दिले जाणार आहेत. त्यानुसार अशा कार्डधारकांनी मागणी केल्यास त्यांना धान्य देण्याबाबत दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. सदर योजनेच्या लाभ घेण्याकरिता स्थानिकांना प्राधान्य राहणार आहे. मात्र, लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Benefit of 'One Nation One Ration' to foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.