गाव समित्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:01:13+5:30

कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागांच्या सहकार्याने प्रबोधन मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून नोंद घेण्यात येत आहे.

The axis of corona control over village committees | गाव समित्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा

गाव समित्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत, शिक्षकांवर जबाबदारी : गावोगावी प्रबोधन, मोक्याच्या ठिकाणी सूचनापत्रांचे स्टीकर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबविणे, त्याबाबत नोंदी पोर्टलवर घेऊन संवाद केंद्रामार्फत त्यांच्या आरोग्याची माहिती घेणे तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबतचे प्रबोधन व जनजागृती गावातील नागरिकांमध्ये गाव कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीमार्फत करण्यात येत आहे.
कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागांच्या सहकार्याने प्रबोधन मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून नोंद घेण्यात येत आहे. गावातील नागरिकांना वैयक्तिक प्रवासादरम्यान दक्षता, कामाच्या ठिकाणी स्वच्छता व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्याबाबत प्रबोधन, गावातील दुकानदार, व्यापारी, आस्थापना मालक ज्यांना मालाच्या खरेदी-विक्रीसाठी शहरात जावे लागते, अशा दुकानदारांनी कोणती दक्षता घ्यावी, यासाठीचे स्टीकर त्यांचे दुकानापुढे लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वस्तू खरेदी करताना दुकानाबाहेर शारीरिक अंतराचे पालन होण्याबाबत दुकानदार व नागरिकांमध्ये प्रबोधन करणे, वैयक्तिक स्वच्छता पाळण्याची दक्षता घेण्यासाठी सूचनापत्रांचे स्टीकर गावातील प्रत्येक दुकानाचे बाहेर लावण्यात येत आहेत.
गृह अलगीकरणातील व्यक्तींच्या घरावर लावावयाचे स्टीकर व त्यामध्ये त्यांनी कोणती दक्षता घ्यावयाची आहे, याबाबतची नियमावली नमूद करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.

ग्रामपंचायत स्तरावर जागर
सर्व ग्रामपंचातींना जनजागृतीचे साहित्य, बॅनर आदी वाटप करण्यात आले असून, त्यामध्ये कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्त ींसाठी आवश्यक असणाऱ्या सूचनापत्रांचे स्टीकर, दुकानदार व आस्थापना मालक यांच्यासाठी सूचनापत्रांचे स्टीकर, दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सूचनापत्रांचे स्टीकर, गृह विलगीकरण पाळणाऱ्या व्यक्तींसाठी सूचनापत्र आदी साहित्य पुरविण्यात आले. ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.

आरोग्य तपासणी मोहीम
जनजागृतीसोबत गावातील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आशांना पल्स ऑक्सीमीटर पुरविण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याबाबतची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच कोविड सकारात्मक रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्ट नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणीला करण्यात आली आहे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यास वा कोविड सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती कळवावी तसेच गावपातळीवरील कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: The axis of corona control over village committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.