ईलेक्ट्रीक मशीनद्वारे अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:43+5:302021-01-25T04:14:43+5:30

अमरावती: गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ईलेक्ट्रीक मशीनद्वारे ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना दोन जण आढळून आले. हा प्रकार नियमबाह्य असल्याने ...

Arrested for illegally filling gas in auto through electric machine | ईलेक्ट्रीक मशीनद्वारे अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरणारे अटकेत

ईलेक्ट्रीक मशीनद्वारे अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरणारे अटकेत

Next

अमरावती: गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ईलेक्ट्रीक मशीनद्वारे ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना दोन जण आढळून आले. हा प्रकार नियमबाह्य असल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ऑटो, ईलेक्ट्रीक मशीन, गॅस सिलिंडर व इतर साहित्य असा एकूण २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उस्माननगरात नागपुरीगेट पोलिसांनी शनिवारी केली.

अब्दुल सादीक अब्दुल नजीर (वय ३२), शाहीद अहेमद शकील अहेमद (३० दोन्ही रा. उस्माननगर) असे आरोपीचे नाव आहे. विशेष पथकाचे पीएसआय पंकज कुमार चक्रे यांना दोन युवक अवैधरित्या ईलेक्ट्रीक मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना आढळून आले. आरोपीविरुद्ध कलम ३,७ ईसी ॲक्ट अत्यावश्यक वस्तू अधिनियम, ईसी ॲक्ट जीवनावश्यक वस्तूंचा गैरवापर करणे, अत्यावश्यक वस्तू अधिनियमनुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Arrested for illegally filling gas in auto through electric machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.