अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट; शिशू मृत्यूमुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:42 AM2022-09-26T05:42:34+5:302022-09-26T05:42:57+5:30

आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आणखी एका शिशुची प्रकृती गंभीर आहे.

Amravati Ventilator explosion The infant died remember of bhandara fire | अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट; शिशू मृत्यूमुखी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट; शिशू मृत्यूमुखी

Next

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) एसएनसीयूमध्ये नव्याकोऱ्या व्हेंटिलेटरचा रविवारी स्फोट होऊन एका शिशुचा मृत्यू झाला. १२ नवजात शिशूंना इतर ठिकाणी हलविले. आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आणखी एका शिशुची प्रकृती गंभीर आहे. स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. यामुळे ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा रुग्णालयाच्या अग्निकांडाची आठवण ताजी झाली.

व्हेंटिलेटरने पेट घेताच सलमा खान या परिचारिकेने व्हेंटिलेटरवरील नवजात शिशूंना उचलून बाजूला केले. आगीमुळे विभागात सर्वत्र धूर पसरला होता. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले.

महिनाभरापूर्वीचे व्हेंटिलेटर
या विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर असून, दोन व्हेंटिलेटर महिनाभरापूर्वीच प्राप्त झाले होते. याच नवीन व्हेंटिलेटरमधील एका व्हेंटिलेटरला आग लागली. हे व्हेंटिलेटर शनिवारी रात्रीपासून चालू-बंद होत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

क्षमता २७, दाखल ३७
या विभागाची क्षमता २७ बालके भरती करण्याची आहे; परंतु या ठिकाणी नेहमीच ३५ ते ४० शिशू दाखल असतात. रविवारीदेखील येथे ३७ शिशू उपचारांसाठी दाखल होते.

फायर ऑडिट होऊनही... 
या विभागात यापूर्वीही शॉर्टसर्किट झाले होते. बीएमसीकडून रुग्णालयातील फायर ऑडिट झाल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली. त्यामुळे रुग्णालयात शॉर्टसर्किट होते कसे, असा प्रश्न आहे.

Web Title: Amravati Ventilator explosion The infant died remember of bhandara fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.