अमरावती निवडणूक निकाल; अचलपूरमध्ये बच्चू कडू यांचा पुन्हा करिष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 03:46 PM2019-10-24T15:46:54+5:302019-10-24T15:47:33+5:30

Amravati/ Achalpur Election Results 2019; Bacchu Kadu Vs Anirudha Deshmukh अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू ८३९६ मतांनी विजयी.

Amravati election results; Bacchu Kadu Vs Anirudha Deshmukh | अमरावती निवडणूक निकाल; अचलपूरमध्ये बच्चू कडू यांचा पुन्हा करिष्मा

अमरावती निवडणूक निकाल; अचलपूरमध्ये बच्चू कडू यांचा पुन्हा करिष्मा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू ८३९६ मतांनी विजयी. बच्चू कडू यांना ८१२५२ मते, तर अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांना ७२८५६ मते मिळाली.
२०१४ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपाचे अशोक बनसोड यांना पराभूत करून विजयाची हॅटट्रीक केली होती. या निवडणुकीत भाजपा वगळता काँग्रेससह राष्ट्रवादी, बसप, सेना, मनसे आदींसह १७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले होते. विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एकूण ६७.०३ टक्के मतदान झाले. येथे पुरुषांचे मतदान ७१.२० टक्के व महिलांचे मतदान ६२.५९ टक्के नोंदविले गेले. गतवर्षी या मतदारसंघात ७०.३७ टक्के मतदान झाले होते.

Web Title: Amravati election results; Bacchu Kadu Vs Anirudha Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.