निधी वाटपावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:25+5:30

महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना प्रत्येकी २० लाख, शिवसेना व बसपाचे गटनेता यांना प्रत्येकी १५ लाख, अपक्ष गटनेता यांना १० लाखांचा निधी देण्यात आला. तर फक्त एमआयएमलाच डावलण्यात आल्याचे सांगत, ‘आपला माणूस, आपला महापौर कुठे?’ असा सवाल अब्दुल नाझीम यांनी केला.

The allocation of funds | निधी वाटपावरून गदारोळ

निधी वाटपावरून गदारोळ

Next
ठळक मुद्देमहापालिका आमसभा : सभागृहात एमआयएम आक्रमक, काँग्रेसची साथ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत महापालिकेला प्राप्त निधीतून फक्त एमआयएमलाच डावलल्याचा आरोप गटनेता अब्दुल नाझीम यांनी महापालिका सभागृहात केल्याने सत्तापक्ष व विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. गुरुवारच्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर नाझीम यांनी सभापतींना याविषयी विचारणा केल्यानंतर हा प्रकार घडला.
महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना प्रत्येकी २० लाख, शिवसेना व बसपाचे गटनेता यांना प्रत्येकी १५ लाख, अपक्ष गटनेता यांना १० लाखांचा निधी देण्यात आला. तर फक्त एमआयएमलाच डावलण्यात आल्याचे सांगत, ‘आपला माणूस, आपला महापौर कुठे?’ असा सवाल अब्दुल नाझीम यांनी केला. सभागृहात १० सदस्य असणारा एमआयएम हा तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष असताना सभापतींना एवढा तिटकारा का, अशी त्यांनी विचारणा केली. शहरात अन्य प्रभागांत ‘वॉक अँड टॉक वुईथ मेयर’ हा चांगला उपक्रम राबविणाºया महापौरांना आमचा प्रभाग दिसत नाही काय? शहरातल्या सर्व स्मशानभूमींची पाहणी करून कामे सुचविणाºया महापौरांना कब्रस्तान दिसले नाही, असा आरोप केल्यानंतर सत्तापक्षातील बाळासाहेब भुयार, अजय सारसकर, सचिन रासने, तुषार भारतीय, संध्या टिकले, मिलिंद चिमोटे आदी सदस्यही आक्रमक झाले. आजच्या सभेत हा विषय नाही, सभागृह नियमाने चालावे, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे रेटून धरली.
सभागृहात गोंधळ सुरु झाल्याने एकमेकांनी मत मांडावे, अशी सूचना ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी केली. एका गटाला एक व दुसºया गटाला दुसरा नियम का, असा सवाल करीत बसपाचे चेतन पवार एमआयएमच्या मदतीला धावले. सभापती हे एका पक्षाचे नव्हे, शहराचे आहेत. एखाद्या सदस्यावर जर अन्याय झाला असेल, तर त्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे सुचवित मंजूषा जाधव यांनीही सुरात सूर मिसळला. निधीचे असमान वाटप होत असल्याने महापौर सर्वांचे की भाजपचे, असा सवाल अब्दुल नाझीम यांनी उपस्थित केला. पक्षाचा उल्लेख केल्याचा आरोप करीत सत्तापक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.

क्रीडापटूंच्या मदतीसाठी लगेच निर्णय
शहरातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उंचावत असताना त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गतवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मात्र, एक वर्षानंतरही ही मदत मिळाली नसल्याचा मुद्दा सभापतींच्या परवानगीने तुषार भारतीय यांनी लावून धरला. तांत्रिक कारणांमुळे ही मदत मिळू शकली नसल्याचे स्पष्ट करीत, येत्या चार दिवसात खेळाडूंना ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजय निपाणे यांनी सभागृहाला दिली.

Web Title: The allocation of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.