सारेच बुचकळ्यात, कारण कळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:13 AM2021-01-23T04:13:53+5:302021-01-23T04:13:53+5:30

वृद्धाची आत्महत्या प्रकरण : घातपात नाहीच वाठोडा शुक्लेश्वर : घराच्या अंगणात शेकोटी पेटवून त्यात स्वत:ला झोकून आत्मघात करून घेणाऱ्या ...

All confused, because I didn't understand! | सारेच बुचकळ्यात, कारण कळेना!

सारेच बुचकळ्यात, कारण कळेना!

Next

वृद्धाची आत्महत्या प्रकरण : घातपात नाहीच

वाठोडा शुक्लेश्वर : घराच्या अंगणात शेकोटी पेटवून त्यात स्वत:ला झोकून आत्मघात करून घेणाऱ्या मधलापूर झांजी येथील वृद्धाच्या आत्महत्येने सारेच बुचकळ्यात पडले आहेत. पोलिसांसह कुटुंबालादेखील आत्महत्येचे कारण कळेनासे झाले आहे. तर, दुसरीकडे कुणीही घातपाताची शंका वा तक्रार केली नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

घरातील सदस्य शेतात गेले असताना श्रीकृष्ण काशीराव झासकर (६५) यांनी घराच्या अंगणात पेटत्या शेकोटीत उडी घेतली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना उघड झाल्यानंतर कुटुंब व ग्रामस्थांना दिसला तो झासकर यांचा काळा ठिक्कर पडलेला मृतदेहच. सायंकाळची शांत वेळ असताना एखादी व्यक्ती शेकोटी पेटवते. त्यात उडी घेऊन स्वत:ला जाळून घेते. जिवंत माणूस मरण्याइतकी एखाद्या शेकोटीची धग नसते. त्यामुळे झासकर यांचा जळून मृत्यू व्हावा, काही वेळातच त्यांचा मृतदेह बाजूने पडलेला असावा, राखही विझलेली असावी, या बाबी शंकेला वाव घेण्यास पुरेशा आहेत. कुटुंबाने घातपात नाकारला आहे. मात्र, घरी सारे काही योग्य सुरू असताना, श्रीकृष्ण झासकर यांनी आत्महत्येसाठी इतका विघातक मार्ग का स्वीकारला, हे तूर्तास अनाकलनीय ठरले आहे. दरम्यान, शुक्रवारी झासकर यांचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोट

याप्रकरणी कुटुंबीयांचे बयाण नोंदविणे बाकी आहे. कुटुंबाने घातपाताची शक्यता व्यक्त केलेली नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘ड्यू टू बर्निंग’ असे नमूद आहे.

- किशोर जुनघरे, ठाणेदार, खोलापूर पोलीस ठाणे

Web Title: All confused, because I didn't understand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.