अचलपूर ठाणे बनले 'स्मार्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:49+5:30

नव्या प्रशासकीय इमारतीत पीआय, एपीआय व पीएसआयकरिता चार स्वतंत्र प्रशस्त कक्ष आहे. या कक्षाला एक स्वतंत्र अँटीचेंबरसह प्रसाधनगृह देण्यात आले आहे. पोलीस ठाणेस्तरावर स्वतंत्र अँटीचेंबर असलेली ही पहिली प्रशासकीय इमारत असून आपापल्या स्वतंत्र कक्षातून पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे.

Achalpur Thane becomes 'smart' | अचलपूर ठाणे बनले 'स्मार्ट'

अचलपूर ठाणे बनले 'स्मार्ट'

Next
ठळक मुद्देपीआयसह एपीआयला स्वतंत्र अँटीचेंबर : स्वतंत्र कक्षातून कामकाज सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर पोलीस अखेर स्मार्ट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. भाड्याचे घर त्यांनी सोडले आहे. स्मार्ट पोलीस ठाण्यातून आपल्या स्मार्ट कामकाजास त्यांनी सुरूवात केली आहे.
पोलीस ठाण्याकरिता अचलपूर शहरात साकारली गेलेली जिल्ह्यातील ही पहिली स्मार्ट इमारत ठरली आहे. या नव्या प्रशासकीय इमारतीत पीआय, एपीआय व पीएसआयकरिता चार स्वतंत्र प्रशस्त कक्ष आहे. या कक्षाला एक स्वतंत्र अँटीचेंबरसह प्रसाधनगृह देण्यात आले आहे. पोलीस ठाणेस्तरावर स्वतंत्र अँटीचेंबर असलेली ही पहिली प्रशासकीय इमारत असून आपापल्या स्वतंत्र कक्षातून पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे.
या स्मार्ट इमारतीत महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र पोलीस कोठडी आहे. अद्ययावत शस्त्रागारही आहे. स्वागत कक्षासह पासपोर्ट व्हेरीफिकेशन आणि कॉम्प्युटर सेटअपकरिता स्वतंत्र कक्ष आहेत.
पाहताक्षणी हेवा वाटावा, अशी ही इमारत असून, नैसर्गिक प्रकाश व्यवस्थेला यात प्राधान्य देण्यात आले आहे. या दोन मजली इमारतीच्या आत मध्यभागी खुला कॉरिडॉर ओपन टू स्काय ठेवण्यात आला आहे. या इमारतीत एकूण ३० खोल्या आहेत. यातील १५ ग्राऊंड फ्लोअरवर, तर १५ फर्स्ट फ्लोअरवर आहेत.
या इमारतीला लागूनच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता स्वतंत्र स्मार्ट वसाहत उभारली गेली आहे. यात एकूण ५६ सदनिका आहेत. यात अधिकाऱ्यांकरिता आठ आणि पोलिसांकरिता ४८ सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सदनिकांमध्येही पोलीस अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास आले आहेत.
१९ फेब्रुवारी २०१७ मध्ये या इमारतीचे भूमिपूजन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी जयंत मीना यांच्या उपस्थितीत पार पडले. तीन वर्षांनंतर ही इमारत व सदनिका पोलिसांच्या सेवेत रूजू झाली आहे. तब्बल १४७ वर्षांनंतर या अचलपूर पोलीस स्टेशनचे रूपडे पालटले आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
या इमारतीच्या अनुषंगाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी परत वापरात घेण्याचे नियोजन केल्या गेले आहे. परिसरात फुलविण्यात येणाºया बगिच्यातील झाडांना ते पाणी मिळणार आहे.

जीम। ग्रंथालय
या स्मार्ट इमारती व सदनिकांतर्गत त्याच परिसरात स्वतंत्र ग्रंथालय आणि जीमची व्यवस्था करण्यात आली आहे. बगिचा, लॉनसह लहान मुलांच्या खेळण्याकरिता खेळणीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

वॉटर हार्वेस्टिंग
या स्मार्ट पोलीस ठाण्यांंतर्गत ६ हजार ७२ चौरस मीटर म्हणजेच ६० हजार चौरस फुटांचे हे बांधकाम आहे. या बांधकामाच्या छतावरील पावसाचे संपूर्ण पाणी जमिनीत मुरविण्याची, गोळा करण्याची परिणामकारक व्यवस्था साकारण्यात आलेली आहे.

Web Title: Achalpur Thane becomes 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.