पालकमंत्र्यांची पीडीएमसी, सुपर स्पेशालिटीत आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 05:00 AM2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:57+5:30

नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.  रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये.

Accidental visit of Guardian Minister to PDMC, Super Specialty | पालकमंत्र्यांची पीडीएमसी, सुपर स्पेशालिटीत आकस्मिक भेट

पालकमंत्र्यांची पीडीएमसी, सुपर स्पेशालिटीत आकस्मिक भेट

Next
ठळक मुद्देऑक्सिजन प्लांटची पाहणी, कोविड रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती  : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांना  ऑक्सिजनचा पुरवठा होण्याबाबत समस्या निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पीडीएमएमसी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबतची माहिती घेतली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये ४५ अतिरिक्त बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. रुग्णसेवा पुरविताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.  रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये. तसे निदर्शनास आले तर ती तत्काळ दूर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शंभर टक्के खबरदारी आवश्यक
सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा सुसज्ज करावी. रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टॉफशीही त्यांनी संवाद साधला. सध्याचा काळ कठीण आहे. आपली स्वत:ची सुरक्षितता जोपासून आपण सर्वांनी मिळून या कठीण काळावर मात करायची आहे.   शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.   

रुग्णांच्या आप्तांशी संवाद 
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून ना. ठाकूर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही.  त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी रुग्णांच्या आप्तांना  एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

Web Title: Accidental visit of Guardian Minister to PDMC, Super Specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.