संक्षिप्त प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:25+5:302021-03-08T04:14:25+5:30

अमरावती : ‘मीच माझी व माझ्या कुटुंबाची रक्षक’ हा कोरोना नियम उद्घोषणा स्पर्धेत शहरातील २८० सर्व स्तरांतील महिलांनी सहभाग ...

Abbreviated Territorial | संक्षिप्त प्रादेशिक

संक्षिप्त प्रादेशिक

Next

अमरावती : ‘मीच माझी व माझ्या कुटुंबाची रक्षक’ हा कोरोना नियम उद्घोषणा स्पर्धेत शहरातील २८० सर्व स्तरांतील महिलांनी सहभाग घेतला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित केली. ८ मार्च रोजी विजेत्यांची घोषणा होणार आहे.

--------

रोटरी क्लबतर्फे नागरिकांसाठी मदत केंद्र

अमरावती : कोरोना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची कमी संख्या व ऑनलाईन नोंदणी यामुळे ज्येष्ठ नागरिकांची अडचण झाली. ही अडचण कमी करण्याकरिता रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनने राजापेठ येथे नंदा मार्केटजवळील मातृछाया रुग्णालयात ५ मार्चपासून कोव्हिड-१९ व्हॅक्सिनेशन साहाय्यता केंद्र सुरू केले आहे.

-----------

महिला सक्षमीकरणावर आज कार्यशाळा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन ८ मार्चला दुपारी १ वाजता करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहतील. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शन याप्रसंगी लाभणार आहे.

Web Title: Abbreviated Territorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.