६५ संक्रमित; एकूण १५५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:01:15+5:30

महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५५० वर पोहोचली आहे.

65 infected; Total 1550 | ६५ संक्रमित; एकूण १५५०

६५ संक्रमित; एकूण १५५०

Next
ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ: संक्रमणमुक्तांचेही प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १५५० वर पोहोचली आहे.
सकाळी प्राप्त अहवालानुसार सिंधी कॅम्प, बडनेरा येथे ५५ वर्षीय, छायानगरातही ५५ वर्षीय, चांदूर बाजार तालुक्यात खरपी येथे २७ व ६५ वर्षीय, द्वारकानाथ कॉलनीत ७४ वर्षीय, अचलपूर येथे ६० वर्षीय, वलगाव येथे ४४ वर्षीय, कॅम्प भागात गुरुकृपा कॉलनीत ६९ वर्षीय, अंबागेट भागात पटवीपुरा येथे २५ वर्षीय, भिवापूरकरनगरात २६ वर्षीय, लक्ष्मी नगरात ३९ वर्षीय, गणेश कॉलनीत ३३ वर्षीय, मसानगंज येथे ३९ वर्षीय, सुंदरलाल चौक विजयनगर येथे २८ वर्षीय, गाडगेनगरात २१ वर्षीय, साई नगरातील गावंडे लेआऊट येथे ३१ वर्षीय व देशमुख लॉनच्या मागील भागातील सर्वोदय विकास कॉलनीत ३५ वर्षीय पुरुष तसेच अचलपुरात ६० वर्षीय, दर्यापुरात ८० वर्षीय, वडाळी कॅम्प येथे ५६ वर्षीय, नवसारी येथे २५ वर्षीय, लक्ष्मीनगर येथे २० वर्षीय, गाडगेनगर पलाश लाईन येथे ५२ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीत ९, १५ व ३५ वर्षीय, साबनपुऱ्यात ५७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
दुपारच्या अहवालात कॅम्प येथे ५३ वर्षीय, देऊरवाडा ४५ वर्षीय, राधानगरात ३३ वर्षीय शंकरनगरात १७ व ४७ वर्षीय, बडनेरा चंद्रनगरात ३० वर्षीय, गोपालनगरात २५ वर्षीय, बच्छराज प्लॉट येथे ७७ वर्षीय, हरिगंगा आॅईल मिलजवळ ३० वर्षीय, आनंदनगरात ५० वर्षीय, जाफरजीन प्लॉट येथे ६० वर्षीय, खत्री कंपाऊंड येथे ३० वर्षीय, अर्जुननगरात ३४ वर्षीय पुरुष व शंकरनगरात १५ वर्षीय, बडनेरा मिलचाळ येथे ५५ वर्षीय, वडाळीला ३३ वर्षीय, माहुली जहांगीरला ३१ वर्षीय, राजापेठला २७ वर्षीय, हरिगंगा आॅईलमिल येथे ५० वर्षीय, अचलपूरला ३१ वर्षीय व मोर्शी तालुक्यात पुलगाव येथे ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

रात्रीच्या अहवालात १७ पॉझिटिव्ह
गुरुवारी रात्री प्राप्त अहवालात १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये अकोट तालुक्यात मावला येथील २८ वर्षीय पुरुष, शंकरनगरात ३५ वर्षीय महिला, अचलपूरला २४ वर्षीय पुरुष, काटआमला येथे २४ वर्षीय पुरुष, राजापेठ येथे ५८ वर्षीय पुरुष, कोर्ट रोड येथे ३० वर्षीय पुरुष, नवाथे प्लॉट येथे ३७ वर्षीय पुरुष, सोनल कॉलनीत ३४ वर्षीय पुरुष, पूर्णानगरात १४ वर्षीय बालिका, नरहरीनगरात ६० वर्षीय महिला, रहमतनगरात ६५ वर्षीय महिला, परतवाड्यात ६२ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे ५० वर्षीय महिला, पळसखेड येथे ८ वर्षीय बालिका, दर्यापूर तालुक्यात आमला येथे ५२ वर्षीय पुरुष, अचलपूर तालुक्यात ५५ वर्षीय पुरुष, तसेच कंवरनगरात ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Web Title: 65 infected; Total 1550

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.