जिल्ह्यात ६२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:01:15+5:30

शहरात हैदरपुऱ्यातील चार संक्रमितांना १८ व्या दिवशी, तर त्याच कुटुंबातील एका महिलेला विसाव्या दिवशी कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुटुंबातील एक महिला व दुसºयाच दिवशी एक तरुण कोरोनामुक्त झाला. या सर्वांचे १५ दिवसांच्या उपचारानंतरचे सलग दोन थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्यानंतर या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले.

62% of patients in the district are corona free | जिल्ह्यात ६२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ६२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ६२ रुग्णांना डिस्चार्ज। उपचारानंतर बरे की नव्या गाईड लाईनचा दिलासा?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात शहरासह ग्रामीणमध्ये कोरोनाचे १०१ रुग्ण निष्पन्न झाले. महिनाभरात ६२ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६२ टक्के असल्याची बाब दिलासा देणारी आहे. चार दिवसांच्या अवधीत ४१ जण कोरोना संक्रमणातून मुक्त झाले. त्यांना घरी क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले की त्यांना आरोग्य विभागाच्या नव्या गाइड लाइननुसार मुक्त केले जात आहे, याविषयी मात्र नागरिकांमध्ये चर्चा झडत आहेत.
शहरात हैदरपुऱ्यातील चार संक्रमितांना १८ व्या दिवशी, तर त्याच कुटुंबातील एका महिलेला विसाव्या दिवशी कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुटुंबातील एक महिला व दुसºयाच दिवशी एक तरुण कोरोनामुक्त झाला. या सर्वांचे १५ दिवसांच्या उपचारानंतरचे सलग दोन थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्यानंतर या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर ९ मे रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठीच्या नव्या ‘गाइड लाइन’ जारी झाल्या आणि जिल्ह्यात चार दिवसांत ४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आले व तेथेच त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. याविषयीचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेले आणखी काही रुग्ण नव्या गाइड लाइननुसार कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, या रुग्णांना आता पाच दिवसांचा औषधांचा कोर्स व त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवून कोणतीही लक्षणे न आढळल्यास त्यांना कोरोनामुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये अतिजोखीम व आयसीयूमधील रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात येणार नाही. जिल्ह्यात एकूण संक्रमित १०१ रुग्णांच्या तुलनेत आतापर्यंत ६२ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६१.३८ टक्के आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची नवी मार्गदर्शक तत्त्वे चर्चेत आलेली आहेत. रोज संक्रमितांची संख्या वाढती असताना, त्याप्रमाणात १० दिवसांत सौम्य व अतिसौम्य लक्षणांचे रुग्ण उपचारानंतर बरे होत असल्याने जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची चिंता मिटू लागली आहे. त्याचवेळी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया दखलनीय ठरतात.

संक्रमितांचा मृत्युदर १३ टक्क््यांवर
जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ३ एप्रिल रोजी हाथीपुºयात निष्पन्न झाला. त्यांचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला. त्यानंतर येथील क्लस्टर झोनमध्ये पाच अशा सहा रुग्णांच्या होमडेथ झाल्यानंतर थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. उपचारादरम्यान कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर पोहोचली. जिल्ह्यात निष्पन्न झालेल्या १०१ कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १२.८७ टक्के आहे. सुरुवातीला हे प्रमाण विदर्भात सर्वात जास्त होते. मात्र, आरोग्य यंत्रणाद्वारे मृताचे थ्रोट स्वॅब घेणे बंद करून मृताच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने घेणे सुरू केल्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत निष्पन्न रुग्णसंख्येच्या तुलनेत २५.७४ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नव्या गाइड लाइन आयसीएमआरच्या नियमाधारित आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आपल्याकडे कमी आहे. मात्र, मुंबई, पुणे आदी शहरांत तो वाढत आहे. सिस्टीम कधी ब्रेक होईल, सांगता येत नाही. या सिस्टीममध्ये एकवाक्यता पाहिजे. यासाठी शास्त्रीय कारण आहे व प्रोटोकॉलप्रमाणे प्रमाणित आहेत.
- डॉ. अनिल रोहनकर
अध्यक्ष, आयएमए, अमरावती

आरोग्य विभागाच्या नव्या गाइड लाइननुसार सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांना १० दिवस, लक्षणे नाहीत अशा रुग्णांना पाच दिवस उपचार व पाच दिवस निरीक्षणात ठेवण्यात येते. त्यानंतर लक्षणे नसल्यास डिस्चार्ज दिला जातो. लेखी हमीपत्रावर ७ ते १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवले जाते. आयसीयू रुग्णांना डिस्चार्ज देत नाही.
- डॉ श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 62% of patients in the district are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.