८४ दिवसात ५०८ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:01:07+5:30

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला अमरावती शहरातील हाथीपुरा भागात झाल्यानंतर ४३ दिवसांत १०० संक्रमित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यानंतरच्या १३ दिवसांत आणखी १०० व्यक्ती आढळून आल्या. पुढील १२ दिवसांत १००, त्यानंतर आठ दिवसांत १०० व आताही आठ दिवसांत १०० संक्रमितांची नोंद होऊन कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाचशेचा आकडा गाठला.

508 infected in 84 days | ८४ दिवसात ५०८ संक्रमित

८४ दिवसात ५०८ संक्रमित

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी २२ : इलाजाला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद; घातकपणा घटला, भय ओसरले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरासह जिल्हा ग्रामीणमध्ये १२० भागांत कोरोनाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८४ दिवसांत ५०८ व्यक्ती संक्रमित झाल्या. शनिवारी पुन्हा २२ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला अमरावती शहरातील हाथीपुरा भागात झाल्यानंतर ४३ दिवसांत १०० संक्रमित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यानंतरच्या १३ दिवसांत आणखी १०० व्यक्ती आढळून आल्या. पुढील १२ दिवसांत १००, त्यानंतर आठ दिवसांत १०० व आताही आठ दिवसांत १०० संक्रमितांची नोंद होऊन कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाचशेचा आकडा गाठला.
शनिवारी प्राप्त अहवालात २२ संक्रमित व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये रहाटगाव येथील २६ वर्षाचा तरुण, जुन्या पॉवर हॉऊसजवळील अशोकनगरात १८ वर्षीय युवक, डेंटल कॉलेजजवळील मेहरबाबा कॉलनीत ३१ वर्षीय व्यक्ती, रुक्मिणीनगरात ३२ वर्षीय महिला, वलगाव येथे ३४ वर्षीय महिला, साबणपुऱ्यात ४० वर्षीय महिला, राजकमल चौकात ५२ वर्षीय महिला, गुलिस्तानगरात ५२ वर्षीय व्यक्ती, धरमकाटा परिसरात २६ वर्षीय महिला तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये मोर्शी तालुक्यात विचोरी येथे २७ वर्षीय तरुण, ५५ वर्षीय व्यक्ती, २४ वर्षीय महिला व रोहनखेड येथे २६ वर्षीय तरुण, अंजनगाव सुर्जी येथे ५२ वर्षीय पुरुष २० वर्षीय तरुणी तसेच कांडली (परतवाडा) येथे २३ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ती सध्या अमरावतीला क्वारंटाईन आहे. याशिवाय शेगाव नाला परिसरात ३२ वर्षीय पुरुष तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट येथील ४४ व ४५ वर्षीय पुरुष येथील एका खासगी रुग्णालयात कोविड-१९ चा उपचार घेत आहेत. रात्री उशिरा चांदूर बाजार तालुक्यात नानोरी येथे ५५ वर्षीय पुरुष, पीडीएमसीत ३२ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
एका खासगी रुग्णालयात दाखल ७७ वर्षीय संक्रमित व्यक्तीचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या किन्नर समाजातील ४० वर्षीय व्यक्तीचा २५ जूनला मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २३ झालेली आहे.

परदेशातून परतलेल्या दोन व्यक्ती संक्रमित
आठवड्यात सहा नागरिक परदेशातून परतले. त्यांना येथील हॉटेलमधील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले. यापैकी दोन २० वर्षीय तरुणींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. दोन दिवसांत येथील पीडीएमसीमधील दोन डॉक्टर संक्रमित झाले आहेत. बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे. या व्यक्तींचा चार दिवसांनंतर स्वॅब घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: 508 infected in 84 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.