२२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:02+5:30

जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला.

22,000 farmers waiting to buy cotton | २२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

२२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देभावांतर योजना लागू करण्याची मागणी : नोंदणी रखडल्याने सुलतानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/जरूड : ‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ म्हणून नावलौकिक असणाºया पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आजमितीस ऑनलाईन नोंदणी केलेल्या २२ हजार २०२ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप झालेली नाही. या कापसाच्या वाती करायच्या का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात आले. १ लाख २८ हजार २७८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. पैकी ८६ हजार ३८० शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात २२ हजार २०२, अकोला जिल्ह्यात १९ हजार १७, वाशीम जिल्ह्यात ३ हजार ३५२, यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५ हजार ४५३, बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार ३५६ शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे.
अमरावती विभागात ९८ जिनिंग प्रेसिंग आहेत. परंतु ग्रेडरची संख्या फक्त ७९ आहे. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस फक्त ७९ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असते. प्रत्येक केंद्रावर रोज ५० शेतकऱ्यांना बोलावले जातात. सर्व केंद्रांनी या गतीने काम केल्यास ३ हजार १५० शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. ८६ हजार शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यास किमान १ महिना लागणार आहे. सर्व केंद्र अव्याहतपणे सुरु राहिले तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कापूस खरेदी आटोक्यात येणे या गतीने शक्य नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांची कापसाची ऑनलाईन विक्रीकरिता नोंदणी व्हायची आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता अजून ५ दिवस देण्यात यावे, अशी मागणी आहे.

कशाचे नगदी पीक?
बाजारातील सद्यस्थिती अतिशय भीषण आहे. खासगी व्यापारी कापूस विकत घ्यायला तयार नाही. खासगी व्यापारी चांगल्या कापसाला ४००० ते ४१०० रुपये भाव देतात. शासकीय खरेदी केंद्राने नाकारलेला कापूस फक्त ३००० रूपये प्रतिक्विंटलनेखरेदी केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना कापूस विकला तरी शेतकऱ्याला किमान १५०० रूपये प्रतीक्विंटल तोटा होतो. त्यामुळे नगदी पैसे देणारे कापसाचे पीक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवाशी आले आहे.

Web Title: 22,000 farmers waiting to buy cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती