जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:04+5:302021-05-07T04:20:04+5:30

.......................................... जम्बो कोविड रुग्णालयातील सुविधांची पाहणी अकोला : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात ...

Zilla Parishad Standing Committee meeting today! | जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा !

जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा !

Next

..........................................

जम्बो कोविड रुग्णालयातील सुविधांची पाहणी

अकोला : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने या कोविड रुग्णालयातील सुविधांची पाहणी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी गुरुवारी केली.

..............................................

ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढला!

अकोला : जिल्ह्यातील शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी चिंता व्यक्त केली.

....................................................

रस्त्यावर माती; वाहनधारक त्रस्त

अकोला : शहरातील अकोट फैलस्थित आपातापा नाका ते दमाणी आय हाॅस्पिटलपर्यंत रस्त्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. खोदून ठेवण्यात आलेल्या या रस्त्यावर मातीचे ढीग साचले आहेत. रस्त्यावर साचलेली माती उडत असल्याने, या समस्येने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

............................................................

जिल्हा परिषदेचे एक प्रवेशद्वार बंद !

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेचे एक प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी बंद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद परिसरात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत जिल्हा परिषदेच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात येत आहे.

.................................................

जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी कमी!

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणारी नागरिकांची गर्दी आता कमी झाली आहे. त्यामुळे दुपारनंतर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे.

................................................

धान्याची उचल सुरू !

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे व जून महिन्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत धान्याची उचल सुरू केली आहे.

Web Title: Zilla Parishad Standing Committee meeting today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.