जिल्हा परिषद शाळेला शासनाकडून आदर्श शाळेचा दर्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:22+5:302021-06-25T04:15:22+5:30

राहुल सोनोने, दिग्रस बु. : पातूर पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ...

Zilla Parishad school status as ideal school by the government! | जिल्हा परिषद शाळेला शासनाकडून आदर्श शाळेचा दर्जा!

जिल्हा परिषद शाळेला शासनाकडून आदर्श शाळेचा दर्जा!

Next

राहुल सोनोने,

दिग्रस बु. : पातूर पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला आदर्श शाळेची मान्यता देण्यात आल्याचे पत्र शाळेचे मुख्याध्यापक संजय बरडे यांना प्राप्त झाल्याची माहिती दिली.

मागील कित्येक वर्षांपासून ही शाळा नेहमी विद्यार्थ्यांसाठी आगळेवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर टाकत आहे. शाळेमध्ये गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या पुढाकारातून तालुक्यातील प्रथमच सेमी इंग्लिश शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शाळेची भव्य इमारत, त्यामध्ये स्वच्छतागृह, मुलाकरिता संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोग खोलीची व्यवस्था, जलसेवा आदी सुविधा आहे. त्यामुळेच या शाळेला आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची मान्यता देण्यात आल्याचे पत्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्राप्त झाले आहे. मान्यता मिळाल्याने गावातील पालक व विद्यार्थी, गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीला आनंद झाला आहे.

फोटो:

जिल्हा परिषद केंद्रीय शाळा दिग्रस बु.

गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने, पालकांना आर्थिक भुर्दंड बसत नाही. मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याचा आनंद होत आहे.

- भारती सुदर्शन गवई

पालक

Web Title: Zilla Parishad school status as ideal school by the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.