जिल्हा परिषद रणधुमाळी : भारिप-बमसं हेच मुख्य ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:35 AM2020-01-02T01:35:07+5:302020-01-02T01:37:16+5:30

सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे.

Zilla Parishad election: Bharip-bombs are the main 'target' | जिल्हा परिषद रणधुमाळी : भारिप-बमसं हेच मुख्य ‘टार्गेट’

जिल्हा परिषद रणधुमाळी : भारिप-बमसं हेच मुख्य ‘टार्गेट’

Next
ाजेश शेगोकार, लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नवे नेतृत्व उदयास येते. जिल्हा परिषदेने अनेक आमदार राज्याला दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला नेते पदापर्यंत पोहोचविणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी, या माध्यमातून आमदारांच्याच प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघाने आमदारांना भरभरून मतांनी निवडून दिले, त्याच मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी आमदारांचा शब्द प्रमाण मानून कार्यकर्त्यांना विजयी करतात का, यावरच आमदारांच्या ताकदीचाही निकाल ठरणार आहे. अकोल्यातील पाच मतदारसंघांपैकी अकोला पश्चिम हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात एकही जिल्हा परिषदेचे सर्कल येत नाही. उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांचे सदस्य निवडल्या जाणार आहेत. या चारही विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजप तर बाळापूर या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघातील आमदारांना आपल्या पक्षाचा जि. प. सदस्य निवडून आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे. भाजपचे मिशन-३५ माजी मुख्यमंत्री प्रचारात लोकसभापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेले यश व वंचित बहुजन आघाडीचा ढासळलेला बुरूज पाहता आता भाजपने जिल्हा परिषद निवडणूक हेच लक्ष्य ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेवर भाजपने आतापर्यंत झेंडा फडकविला नसल्याने शत-प्रतिशत भाजप हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात घेतलेल्या सभेत खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत ‘नवी पाइपलाइन’ टाकण्याची भाषा केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ४ जानेवारी रोजी अकोल्यात प्रचारासाठी येत असल्याने ही निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली आहे, हे स्पष्टच होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे स्वत: प्रचारात उतरले असल्याने अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार मतदारसंघांत भाजपने यशाचा झेंडा गाडला असल्याने येथून जिल्हा परिषदेत मतांचे भरघोस पीक येईल, या अपेक्षेत भाजपचे नेते आहे. भारिप-बमसंसाठी प्रतिष्ठेची लढत जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य करण्यासाठी ना. धोत्रेंनी लोकसभेच्या प्रचारात जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान प्रचारातच दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभेच्या आखाड्यातून ‘वंचित’ला पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला टार्गेट केले जात आहे. यावेळी भारिप-बमसंमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर यांना पॅनल गठित करावे लागले होते. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यात काही प्रमाणात यश आल्याने भारिप-बमसंच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बराच दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भारिप-बमसंकडे केवळ एकच सत्ता केंद्र ताब्यात होते. त्यामुळे येथील सत्ता टिकविण्याचे आव्हान अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आहे. भाजपला इशारा...काँग्रेस आघाडीला आशाजिल्हा परिषदेचे मतदार असलेल्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना विजयासाठी वंचित बहुजन आघाडीने चांगलेच झुंजविले आहे. भाजपला द्यावी लागलेली झुंज काँग्रेससाठी आशावादी ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून मत विभाजन टाळण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यात शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडीचा प्रयोगही केला आहे. त्यामुळे या प्रयोगाला किती यश मिळते, यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेच्या स्वबळाची परीक्षाविधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेनेला एकच जागा मिळाली होती. ती जागा शिवसेनेने जिंकली तर उरलेल्या चार जागांवर भाजपच्या विजयात हातभार लावला. जिल्हा परिषदेत शिवसेना स्वबळावर रिंगणात आहे. त्यामुळे सेनेचे ‘स्वबळ’ किती, याचे मोजमाप यानिमित्ताने होणार आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे जिल्हा परिषदेतून विधानसभेत पोहोचले असून, ते जिल्हाप्रमुखही असल्याने या निवडणुकीत यशापयशाचे बिल त्यांच्याच नावावर फाडले जाणार आहे. सेनेने अकोटमध्ये प्रहाराला सोबत घेऊन मित्रत्व जपण्याचाही संदेश दिला असून, मूर्तिजापुरात काँग्रेससोबत तडजोड केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Zilla Parishad election: Bharip-bombs are the main 'target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.