अकोटात पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:57 PM2020-05-30T12:57:31+5:302020-05-30T14:10:20+5:30

अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

Youth threatens akot police ; Video goes viral | अकोटात पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

अकोटात पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देकाही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली.लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

अकोला : कोरोनाचा प्रादूर्भात टाळण्यासाठी संपूर्ण देशात लागू असलेल्या लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर विविध ठिकाणी हल्ले होत असल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. 
अकोट शहरातील शौकत अली चौकात तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाºयांनी लॉकडाउन असताना बाहेर फिरणाºया काही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर पोलिसांना शिविगाळ करत हे युवक पोलिसांना पाय तोडून हातात देऊ, अशी धमकीही देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिस दारू पिऊन असल्याचा या तरुणांचा आरोप आहे. अकोटातील शौकत अली चौकाजवळच्या अमीनपुरा भागातील हा व्हिडीओ २४ मे रोजीचा असल्याचे समजते. लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या परिसरात पुन्हा दिसले, तर परिणाम भोगण्यास तयार राहा, असा निर्वाणिचा इशाराच हे युवक पोलिसांना देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सद्या हा व्हिडीओ चांगलाच व्हारयरल होत आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती आहे.

Web Title: Youth threatens akot police ; Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.