Youth killed in a bike accident | दुचाकी अपघातात युवक ठार
दुचाकी अपघातात युवक ठार

विझोरा (जि. अकोला): भरधाव मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील येळवण-कानशिवणी मार्गावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्रशांत देशमुख (३७. रा. पिंजर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनूसार, पिंजर येथील प्रशांत देशमुख हे त्यांच्या एम.एच. ३०, ए.डी. ३२९७ क्रमांकाच्या मोटारसायकलद्वारा पिंजर गावाकडे जात होते. येळवण गावाजवळ अचानक रानटी जनावर समोर आल्याने त्यांची मोटारसायकल घसरली. या अपघातात प्रशांत देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे जमादार वानखडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.


Web Title: Youth killed in a bike accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.