‘लगीन देवाचं लागतं’....रेल येथे महादेव व पार्वतीचा लग्नसोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:21 PM2019-04-14T18:21:43+5:302019-04-14T18:24:32+5:30

अकोला : देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांचा लग्नसोहळा अकोट तालुक्यातील रेल या छोट्याशा गावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा काण्यात ...

Wedding of Lord Shiva and Goddess Parvati at village of Akola | ‘लगीन देवाचं लागतं’....रेल येथे महादेव व पार्वतीचा लग्नसोहळा थाटात

‘लगीन देवाचं लागतं’....रेल येथे महादेव व पार्वतीचा लग्नसोहळा थाटात

googlenewsNext

अकोला: देवाधिदेव महादेव व माता पार्वती यांचा लग्नसोहळा अकोट तालुक्यातील रेल या छोट्याशा गावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा काण्यात आला. आदिवासी कोळी महादेव जमातीने शेकडो वर्षापासून ही परंपरा अकोला वासियांना पाहायला मिळाली.

अकोट तालुक्यातील  रेल या छोट्याश्या गावात महादेव आणि पार्वती या देवांच्या लग्न सोहळ्याची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळपासूनच वर व वधू कडील पाहुणे मंडळी या गावात सकाळपासूनच हजेरी लावत होती. वाजंत्री, मंगलाष्टके सारे काही एखाद्या खऱ्याखुऱ्या लग्नासारखे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. हा लग्नसोहळा साजरा करण्याची परंपरा या गावत शेकडो वर्षापासून स्थानिक आदिवासी कोळी जमातीच्या लोकांनी जोपासली आहे. या लग्न सोहळ्याचा मान घुगरे आणि इंगळे परिवाराकडे आहे. इंगळेची वधू माता पार्वती तर घुगरे यांच्याकडे नवरदेवाचा मान आहे. अनादी काळापासून हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही या लग्न सोहळ्यात कोकण, मुंबई , वाशिम , अमरावती, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी बांधव उपस्थित होते. यां लग्न सोहळ्यात तरुण तरुणी आणि महिलां मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. हा लग्नसोहळा रेल येथील रेलेश्र्वर संस्थान यांच्यातर्फे दरवर्षी चैत्र महिन्यातील नवमीला साजरा करण्यात येतो अशी माहिती या लग्न सोहळ्याचे आयोजक सुधाकर घुगरे यांनी दिली. हा लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष रामभाऊ नथुजी घुगरे, ज्येष्ठ मार्गदर्शक ज.पा. खोडके सर, प्रतापराव  मेहसरे, रामचंद्र धनभर, उत्तम इंगळे, रामकृष्ण इंगळे प्रभाकर घुगरे, रेल च्या सरपंच प्रीती घुगरे , रेखाताई इंगळे पोलीस पाटील डॉ. सुधाकर मेहसरे, राजु कडू, विजया राणे,विनायक ढोरे, वर पक्ष मोहन घुगरे वधू पक्ष मोहन श्रीकृष्ण इंगळे, अरुण किरडे साहेब,विलासराव सनगाळे ,गोपाळराव ढोणे, संजय तराळे ,अनिल फुकट ,रघुनाथजी खडसे रुपेश खेडकर, प्रकाश पाटील, पंढरीनाथ डांगरे, गजेंद्र पेठे, संदीप पेठे,सचिन सनगाळे शरद कोलटके मारुती, सुदर्शन किरडे सरपंच अशोकराव किरडे पोलीस पाटील, शिरसाट,भास्करराव खेडकर, नंदू रायबोले ,प्रकाश घाटे, गजानन चुनकीकर, प्रकाश राणे,रामकृष्ण राणे,मधुकर तराळे,शिवानंद तराळे, देवेंद्र भगत, डॉ. विलास सोनोने, दशरथ घावट, अध्यक्ष नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळा घुसर वाडी, रमेश काळे, प्रमोद खर्चाण ,राजाभाऊ सावळे आणि मित्र मंडळ, मंगेश ताडे, राजेंद्र निकुंभ, शंकर सोळंके प्रकाश सांगोरकर आदींनी हा लग्नसोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रम घेतले.

Web Title: Wedding of Lord Shiva and Goddess Parvati at village of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.