नियमांचे उल्लंघन, १७ हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:56+5:302021-05-10T04:18:56+5:30

यामध्ये मास्कचा वापर करताना आढळलेल्या लोकांना दंड ठोकत एक हजारांची वसुली करण्यात आली. तर नियमबाह्य दुकाने उघडणाऱ्या व्यवसायिकांना १६ ...

Violation of rules, 17 thousand fine | नियमांचे उल्लंघन, १७ हजार दंड

नियमांचे उल्लंघन, १७ हजार दंड

Next

यामध्ये मास्कचा वापर करताना आढळलेल्या लोकांना दंड ठोकत एक हजारांची वसुली करण्यात आली. तर नियमबाह्य दुकाने उघडणाऱ्या व्यवसायिकांना १६ हजार दंड ठोकण्यात आला.

शहर पोलीस स्टेशनला बैठक

अकोटः अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ९ मे रोजी ईदनिमित्त मुख्य मौलवी यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून मशीदमध्ये लोकांनी नमाजकरिता न येता घरामध्ये नमाज पठण करण्यात यावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच १४९ सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली.

लसीकरण शिबिरात २३९ लोकांची नोंदणी

अकोटः नगर परिषद शिवसेना गटनेते मनीष कराळे यांनी आयोजित केलेल्या कोविड लसीकरण नोंदणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले. श्री संत गजानन महाराज सभागृह, गजानननगर अकोट येथे आयोजित शिबिरात २३९ लोकांनी नोंदणी केली. शिबिराला नगरसेवक मनीष कराळे, बंडू शिरसाठ, प्रशांत हिंगणकर, राममूर्ती तळोकर, विनोद पुंडकर, मंगेश फाटे, मुन्ना वानखडे, सागर कराळे, अमेय म्हैसने, अनिकेत गोपनारायण, मयूर भगत, विक्की पालखडे, अंकुश पाचपोहे, बजरंग मिसळे उपस्थित होते.

नागरी आरोग्य केंद्रात वयोवृद्धाकरिता स्वतंत्र व्यवस्था करा

अकोटः अकोट शहरातील नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्रात वृध्द माता, पालक, ज्येष्ठ नागरिक यांना स्वतंत्र लसीकरणासाठी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना माजी उपशहरप्रमुख विजय ढेपे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर यांच्याकडे केली आहे. सर्व सुविधांचे योग्य नियोजन असल्यामुळे या केंद्राकडे नागरिकांचा लसीकरणासाठी ओढा आहे. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, त्यासाठी स्वतंत्र संगणक आहे. केवळ संगणक चालवणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागेल तसेच आशासेविका व एक सहकारी, एक पोलीस यांच्याकरिता एक टेबल टाकून स्वतंत्र माहिती व लसीकरणापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडल्यास ज्येष्ठ नागरिक माता यांना कोणताही त्रास होणार नाही, असे पत्र शिवसेना माजी उपशहरप्रमुख विजय ढेपे यांनी दिले आहे.

Web Title: Violation of rules, 17 thousand fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.