अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:42+5:302021-01-15T04:16:42+5:30

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-पिंजर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना गुरुवारी एका लॉनजवळ दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. ...

Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

googlenewsNext

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-पिंजर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना गुरुवारी एका लॉनजवळ दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.

पिंजर-मूर्तिजापूर मार्गाने एक ४० वर्षीय दुचाकीस्वार (एमएच २९ के ४६३ : शेवटचा अंक अस्पष्ट) या क्रमांकाच्या दुचाकीने मूर्तिजापूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. तो बेशुद्धावस्थेत असून त्याच्या मोबाईलला कोड लॉक असल्याने कोणाशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमी अवस्थेत वंचित बहुजन आपत्कालीन पथकाच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. डोक्याला जोरदार दुखापत झाल्याने वृत्त लिहिस्तोवर जखमी दुचाकीस्वार बेशुद्धावस्थेत होता.

Web Title: Two-wheeler seriously injured in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.