पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:28 AM2020-04-29T11:28:02+5:302020-04-29T11:28:35+5:30

चालक व क्लीनर दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

 Two were injured when a truck fell off a bridge | पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी

पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरानजीक असलेल्या रिधोरा येथील एका नदीच्या पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ट्रक कोसळल्याने यामध्ये ट्रकमधील चालक व क्लीनर दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा येथून एम एच २८ बीबी ११०६ क्रमांकाचा ट्रक जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक अचानकच पुलावरील थेट खाली कोसळला. त्यामुळे यामधील ट्रकचालक अब्दुल नासीर अब्दुल नजीर आणि क्लीनर जावेद चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णवाहिकेने तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मदत केली.
त्यानंतर घटनास्थळ पंचनामा केला असता, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया जुने शहर पोलिसांनी सुरू केली होती.

 

Web Title:  Two were injured when a truck fell off a bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.