आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 07:05 PM2020-09-21T19:05:58+5:302020-09-21T19:06:05+5:30

सोमवार २१ सप्टेंबर रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळीचा आकडा २११ वर पोहचला.

Two more died; 117 new positives; 29 coronal free | आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त

आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त

googlenewsNext

 अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार २१ सप्टेंबर रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळीचा आकडा २११ वर पोहचला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६६५० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३ जणांसह, जठारपेठ, डाबकीरोड, प्रसाद कॉलनी येथील प्रत्येकी पाच, निमवाडी येथील चार, जुने शहर येथील तीन, तुकाराम चौक, खोलेश्वर, आनंदनगर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, शिवर-शिवणी, तारफैल, कमला नगर, वानखडे नगर, महाराजा अग्रसेन भवन जवळ, कमला प्लॉट, कान्हेरी गवळी, अकोट, चोहट्टा बाजार, पळसो बढे, दुर्गा चौक, खिरपुरी खुर्द, शरद नगर, अकोला, तिवसा, झोडगा, राधेनगर, पिंजर, रामनगर, रतनलाल प्लॉट, मलकापूर रोड, दहातोंडा, हातगाव, राजुरा घाटे, सांगवा मेळ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये न्यु खेतान नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड येथील तीन, लक्ष्मी नगर मोठी उमरी, खडकी, आदर्श कॉलनी, मलकापूर रोड, चांदुर, रामनगर, कॉग्रेस नगर येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, राधे नगर, रेल ता. अकोट, गंगावल, आळशी प्लॉट, दहिगाव गावंडे, डॉक्टर कॉलनी मलकापूर, नांदगाव ता. बाळापूर, तेल्हारा, कौलखेड जहागीर, कैलास टेकडी, गजानन नगर, सिंधी कॅम्प, शिवणी, मोठी उमरी, झोडगा, पत्रकार कॉलनी, गोकुळ कॉलनी, तुकाराम चौक, गवळी पुरा, बलोदे ले-आऊट, जीएमसी व राजुरा सरोदे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

शहरातील दोघांचा मृत्यू
सोमवार आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिवाजी नगर, अकोला येथील ५४ वर्षीय पुरुष आणि विठ्ठल नगर येथील ६८ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

२९ जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


१६७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२५० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १६७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Two more died; 117 new positives; 29 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.