मालवाहू व प्रवासी वाहनांची अमोरासमोर धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:14 PM2021-01-16T12:14:34+5:302021-01-16T12:17:21+5:30

Accident on Akola-Patur Road दोन जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास घडली.

Two killed, three seriously injured in an Accident on Akola-Patur Road | मालवाहू व प्रवासी वाहनांची अमोरासमोर धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी

मालवाहू व प्रवासी वाहनांची अमोरासमोर धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देएम एच ३० एल २९९६ या मालवाहु वाहनाने जोरदार धडक दिली.अपघातात दोघांचा घटनास्थळीची मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.

पातूर : अकोला ते पातूर मार्गावरील चिखलगाव ते कापशी दरम्यान मालवाहू वाहन व खासगी प्रवासी वाहतुक करणार्या वाहनांची अमोरासमोर धडक होऊन, दोन जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास घडली. प्रवासी घेऊन पातूरच्या दिशेने येत असलेल्या एम एच ३७ ५३८१ क्रमांच्या प्रवासी वाहनास विरुद्ध दिशेने जात असलेल्या एम एच ३० एल २९९६ या मालवाहु वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा घटनास्थळीची मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जमखींमध्ये चिमुकल्या मुलीचाही समावे आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  मृतक व  जखमीची नावे कळू शकली नाही.

सविस्तर वृत्त लवकर.....

Web Title: Two killed, three seriously injured in an Accident on Akola-Patur Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.