प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह, निमखेड गाव सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:17 PM2020-05-27T17:17:05+5:302020-05-27T18:19:31+5:30

प्रशिक्षणार्थी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गाव सील करण्यात आले आहे.

Trainee Police Personnel Positive, Nimkhed Village Seal | प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह, निमखेड गाव सील

प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह, निमखेड गाव सील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लातूर येथून परतलेला प्रशिक्षणार्थी पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड गाव सील करण्यात आले आहे. दरम्यान, आता गावातील १६७ घरांचे आरोग्य विषयक सर्व्हेक्षण होणार असून येथील लोकसंख्या ही ८३० च्या आसपास आहे.
दरम्यान, या पोलिस कर्मचाºयाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील सहा जणांना तपासणीसाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. या व्यक्तीच्या संपर्कातील व जोखीम नसलेल्या २२ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.
मुंबई येथे कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पाश्वर्भूमीवर पोलिसांची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली होती. या तुकडीमध्ये हा पोलिस प्रशिक्षणार्थी होता. दरम्यान, नंतर  त्यांना परत पाठविण्यात आले  होते. परतीच्या प्रवासात या कमर्चाºयाचा लातूर येथील त्याच्या सहकाºयाशी निकटचा संपर्क आला होता. आणि लातूरचा त्याचा सहकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे निमखेड येथे २० मे रोजी पोहोचल्यानंतर या पोलिस कर्मचाºयाने स्वत:ला शेतातच स्वत:चे विलगीकरण करून घेतले होते. दरम्यान, आरोग्य विभागाला याची माहिती लातूर येथून मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने या पोलिस कर्मचाºयाशी संपर्क साधून त्यास २१ मे रोजी बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल केले. २७ मे रोजी या पोलिस कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्याच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी बुलडाणा पाठविण्यात आले असून लो रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले आहे. दुसरीकडे याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार सारिका भगत, तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब मुसदवाले, ग्रामसेवक नंदकिशोर राठोड, सरपंच लक्ष्मण कव्हळे, उपसरपंच परमेश्वर कव्हळे यांच्या सहकाºयाने आता गाव सील करण्यात आले असून हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान चार पथकाद्वारे निमगाव येथील ८३० नागरिक राहत असलेल्या १६७ घरांचे आता आगामी काळात सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याची माहिती देऊळगाव राजा तालुक्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यासाठी एकूण चार पथके नियुक्त करण्यात आली आहे.  (प्रतिनिधी)

सुरक्षीततेबाबत खबरदारी
या प्रशिक्षणार्थी पोलिस कमर्चाºयाने सुरक्षीततेबाबत संपूर्ण खबरदारी घेतली होती. आपला लातूर येथील सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदशर्नास आल्यानंतर या पोलिस कमर्चाºयाने स्वत:स विलग करून घेतले होते. कौटुंबिक पातळीवरही त्याने सुरक्षीत अंतर राखले  होते. त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला फारसे संक्रमण होण्याचा धोका नसल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. 

शारा येथे निर्जंतुकीकरण
 मुंबईवरून परतलेल्या संदिग्ध वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर शारा येथे ही महिला राहत असलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान ज्या स्मशानभूमीत या वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथेही अग्नीश्यामक दलाच्या पथकाने फवारणी करून परिसह निर्जंतुक करण्यात आला आहे. महिलेच्या संपर्कातील ११ जण सध्या बुलडाणा येथे आयसोलेशन कक्षात दाखल असून त्यांच्या चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

‘त्या’ सफाई कर्मचाºयाच्या पत्नीलाही सुटी
४शेगाव येथील सफाई कर्मचारी कोरोना मुक्त झाल्यानंतर दुसºया दिवशी त्याची पत्नीही कोरोना मुक्त झाली आहे. त्यामुळे तिला २७ मे रोजी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेगाव येथील आयसोलेशन कक्षात एकही कोरोना बाधीत नाही. दरम्यान, येथे असलेल्या १५ संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे तर टुनकी येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला खामगाव येथे हलविण्यात आले आहे. शेगाव येथील रुग्णालयाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.

Web Title: Trainee Police Personnel Positive, Nimkhed Village Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.