अकोल्याहून जाणार आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:31 AM2020-09-12T11:31:02+5:302020-09-12T11:35:28+5:30

अप व डाउन अशा सहा गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.

Three more special trains will pass through Akola | अकोल्याहून जाणार आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या

अकोल्याहून जाणार आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या

Next
ठळक मुद्देकेवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येईल.अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आला आहे.

अकोला : ‘अनलॉक-४ अंतर्गत रेल्वेची प्रवासी वाहतूक हळूहळू सुरू करण्यात येत असून, मध्य रेल्वेकडून शनिवार, १२ सप्टेंबरपासून गुजरात ते ओडिशा राज्यादरम्यान आणखी तीन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आला आहे. अप व डाउन अशा सहा गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. या गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवास करता येईल.

खुर्दा रोड ते अहमदाबाद
गाडी क्रमांक - ०२८४३ अप खुर्दा रोड ते अहमदाबाद ही विशेष गाडी १२ सप्टेंबरपासून दर गुरुवार, शुक्रवार, शनिवारी सायंकाळी १८.४० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबादला ०७.२५ ला पोहचेल. ही गाडी दर बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटला अकोला स्थानकावर येईल. नांदुरा व मलकापूर येथेही थांबा असणार आहे. गाडी क्रमांक - ०२८४४ डाउन अहमदाबाद-खुर्दा रोड ही गाडी दर मंगळवार, शुक्रवार, रविवार व सोमवार असे चार दिवस सकाळी ०६.३५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

खुर्दा रोड ते ओखा
गाडी क्रमांक - ०८४०१ अप खुर्दा रोड ते ओखा ही विशेष गाडी दर सोमवारी दुपारी २ वाजून १० मिनिटला अकोला स्थानकावर येईल. या गाडीला शेगाव, मलकापूर येथेही थांबे आहेत. गाडी क्रमांक - ०८४०२ डाऊन ओखा ते खुर्दा रोड ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०६.३५ वाजता अकोला स्थानकावर येईल.

खुर्दा रोड ते गांधीधाम  
गाडी क्रमांक - ०२९७४ अप खुर्दा रोड ते गांधीधाम ही विशेष गाडी दर रविवारी दुपारी १२.१९ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडीला मलकापूर येथेही थांबा असणार आहे. गाडी क्रमांक - ०२९७३ डाऊन गांधीधाम- खुर्दा रोड ही गाडी दर गुरुवारी दुपारी ४.४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

अकोलेकरांसाठी आता १२ विशेष गाड्या
अकोला रेल्वेस्थानकावरून अहमदाबाद-हावडा, मुंबई-हावडा व अहमदाबाद-पुरी या तीन जोडी विशेष रेल्वे गाड्या साप्ताहिक स्वरूपात धावत आहेत. यामध्ये आता आणखी तीन जोडी विशेष गाड्यांची भर पडली आहे. यामुळे अकोलेकरांच्या दिमतीला आता अप व डाउन अशा एकूण १२ विशेष गाड्या असणार आहेत.

Web Title: Three more special trains will pass through Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.