दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:14 PM2020-06-03T12:14:16+5:302020-06-03T12:14:56+5:30

तीन महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब मंगळवारी समोर आली.

 Three-month-old baby overcomes Coronavirus in Patur | दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात

दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात

Next

शिर्ला: एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, या आजारातून सावणाऱ्यांची वाढती संख्याही दिलासा देणारी ठरत आहे. पातूर येथील एका तीन महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब मंगळवारी समोर आली. कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे २२ मे रोजी या बाळाला कोरोनाची लागण झाली होती.
पातूर येथील या छोट्या  बाळाला त्याच्या आई-वडिलांसोबत अकोला येथे आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. बाळ बरं व्हावा यासाठी पातुरातील सर्वधर्मीय प्रार्थना करीत होते. या जगात केवळ तीन महिन्यापूर्वी प्रवेश करणाºया बाळाने कोरोनावर मात केल्याचे वृत्त पातुरात धडकताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. काल रात्री उशिरा अकोला शासकीय महाविद्यालयातून कोरोनातून मुक्त झालेल्या अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला आणि अजून एका ३९ वर्षीय किराणा दुकानदाराला पूर्णपणे बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी सकाळीच शिर्ला कोरोना पथक प्रमुख तथा ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे यांनी तीन महिन्याच्या बालकासह त्याचे आई-वडील आणि परिवारातील लोकांचे स्वागत केले आणि परिवाराला सॅनिटायझर, मास्क, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाºया आरोग्यदायी औषधी दिल्या.यावेळी त्यांच्यासमवेत पथकातील सहाय्यक ग्रामसेवक अक्षय गाडगे,प्रमोद उगले, अंबादास इंगळे, सहदेव काळपांडे उपस्थित होते.

Web Title:  Three-month-old baby overcomes Coronavirus in Patur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.